लॉन्च झाला HMD Global चा पहिला पंच होल कॅमेरा फोन Nokia X71

लॉन्च झाला HMD Global चा पहिला पंच होल कॅमेरा फोन Nokia X71
HIGHLIGHTS

Nokia X71 मध्ये 48 मेगापिक्सल सेंसर सह 3,500 एमएएच ची बॅटरी आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंग सह येते.

महत्वाचे मुद्दे:

  • HMD Global चा Nokia X71 आहे पहिला पंच होल सेल्फी कॅमेरा फोन
  • ट्रिपल रियर कॅमेरा सह येतो Nokia X71
  • 30 एप्रिलला सेल साठी उपलब्ध होईल डिवाइस

HMD Global चा लेटेस्ट फोन Nokia X71 लॉन्च केला गेला आहे. HMD Global कडून Taiwan मध्ये लॉन्च झालेला हा पहिला फोन आहे जो पंच होल डिजाइन सह येतो. Nokia 9 PureView पण Nokia X71 सह सादर करण्यात आला आहे. Nokia X71 कंपनीच्या हाई एन्ड डिवाइस पोर्टफोलियो भाग आहे. त्याचबरोबर जर या फोनची खासियत पाहता Nokia X71 होल-पंच सेल्फी कॅमेरा, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ज्यात 48 मेगापिक्सल सेंसर आहे. तसेच हा डिवाइस स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर, रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि 3,500 एमएएच बॅटरी ने सुसज्ज आहे.

डिजाइन बद्दल बोलायचे तर Nokia X71 2.5D कर्व्ड ग्लास सह येतो. फोनच्या मागील बाजूस कॅमेरा सेटअप वर्टिकल पोजीशन मध्ये आहे. रियर फिंगरप्रिंट सेंसर कॅमेरा सेटअप खाली आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल फोन डिस्प्लेच्या डाव्या कडेला आहे. तसेच वॉल्यूम आणि पावर बटण फोनच्या उजव्या बाजूला देण्यात आले आहेत. हा डिवाइस 30 एप्रिलला सेल साठी उपलब्ध होईल.

Nokia X71 ची किंमत

किंमती बद्दल बोलायचे तर Nokia X71 11,900 तैवानी डॉलर म्हणजे जवळपास 26,600 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तसेच सध्या हा फोन भारतात येणार नाही, तसेच कधी येईल याची पण माहिती मिळालेली नाही. हा फोन एक्लिप्स ब्लॅक रंगात उपलब्ध होईल. हा फोन फक्त एकाच Eclipse Black colour वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

हे आहेत Nokia X71 चे स्पेक्स

ड्यूल सिम सह Nokia X71 फोन मध्ये 6.39 इंचाची फुल-एचडी+ स्क्रीन आहे. हा डिवाइस स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅम सह येतो. फोन एंड्रॉयड पाई वर चालतो. स्टोरेज बद्दल बोलायचे तर यात इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी आहे जी 256 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. ऑप्टिक्स मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात फोनच्या मागे एफ/ 1.8 अपर्चरचा 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, एफ/ 2.4 अपर्चरचा 5 मेगापिक्सलचा डेप्थ ऑफ फील्ड सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल सेंसर देण्यात आला आहे.

डिवाइस मध्ये फ्रंट पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर सह 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर आहे. Nokia X71 ची बॅटरी 3,500 एमएएच ची आहे जो 18 वॉट फास्ट चार्जिंग सह येतो. कनेक्टिविटी फीचर मध्ये वाई-फाई 802.11 ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस + ग्लोनास, यूएसबी टाइप-सी, यूएसबी ओटीजी आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक चा समावेश आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo