48 MP कॅमेऱ्यासह 2 एप्रिलला लॉन्च होऊ शकतो Nokia X71

HIGHLIGHTS

HMD Global ने 2 एप्रिल 2019 ला तैवान मध्ये आयोजित होणाऱ्या इवेंट साठी मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे ज्यातून आगामी स्मार्टफोन Nokia X71 ग्लोबली लॉन्च केला जाऊ शकतो.

48 MP कॅमेऱ्यासह 2 एप्रिलला लॉन्च होऊ शकतो Nokia X71

महत्वाचे मुद्दे:

  • Nokia X71 मध्ये असू शकतो 48-megapixel प्राइमरी रियर कॅमेरा
  • Nokia 8.1 Plus म्हणून Nokia X71 होऊ शकतो ग्लोबली लॉन्च
  • तैवान मध्ये Nokia X71 लॉन्चची तयारी

स्मार्टफोन निर्माता कंपनी नोकियाचा अपकमिंग फोन Nokia X71 लॉन्च करण्याची तयारी सुरु झाली आहे ज्यासाठी HMD Global ने  मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे Nokia X71 साठी लॉन्च इनवाइट तैवान आधारित Sogi कडून शेअर करण्यात आले आहे. HMD Global पुढल्या महिन्यात 2 एप्रिल 2019 ला तैवान मध्ये Nokia X71 लॉन्च करेल जो इंटरनेशनल मार्केट मध्ये Nokia 8.1 Plus म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन HMD Global चा पहिला स्मार्टफोन असेल जो पंच-होल डिस्प्ले सह येईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

मीडिया इनवाइट वरून असा अंदाज लावला जात आहे कि Nokia X71 स्मार्टफोन 48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येईल. तर काही रिपोर्ट नुसार बोलले जात आहे कि Nokia X71 मध्ये सेल्फी सेंसर साठी डिस्प्ले मध्ये पंच-होल देण्यात येईल, अगदी Samsung Galaxy S10 प्रमाणे. MySmartPrice चा रिपोर्ट पहिला तर Nokia X71 ग्लोबल मार्केट मध्ये Nokia 8.1 Plus नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. कारण मागे नोकिया एक्स6 ग्लोबल मार्केट मध्ये नोकिया 6.1 प्लस नावाने आणला गेला होता.

विशेष म्हणजे 2019 च्या सुरवातीला नोकिया 8.1 प्लसचे कथित प्रेस रेंडर समोर आले होते आणि 360-डिग्री वीडियो पण लीक झाला होता ज्यातून डिवाइसच्या पंच-होल डिस्प्ले आणि दोन रियर कॅमेऱ्यांचा खुलासा झाला होता. रिपोर्ट्स नुसार या डिवाइस मध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. आस्पेक्ट रेश्यो किंवा रेसोल्यूशन बद्दल बोलायचे झाले तर त्याची माहिती देण्यात आलेली नाही. डिवाइस स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर सह येऊ शकतो.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo