Nokia 9 PureView चा उत्तराधिकारी 5G सपोर्ट आणि स्नॅपड्रॅगॉन 855 SoC सह होईल लॉन्च

Nokia 9 PureView चा उत्तराधिकारी 5G सपोर्ट आणि स्नॅपड्रॅगॉन 855 SoC सह होईल लॉन्च
HIGHLIGHTS

Nokia 9 PureView ची जागा घेण्यासाठी हा फोन ऑगस्ट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो आणि हा नवीन फोन पण पेंटा-कॅमेरा सेटअप सह येऊ शकतो.

महत्वाचे मुद्दे

  • 5G सपोर्ट सह येईल हा नवीन फोन
  • ऑगस्ट मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे
  • या फोन मध्ये पण दिला जाईल पेंटा-कॅमेरा सेटअप

 

अजून Nokia 9 PureView ची अष्कृत माहिती समोर आली नाही पण या स्मार्टफोनच्या पुढील पिढीच्या स्मार्टफोन बद्दल अफवा इंटरनेट वर येत आहेत. Nokia 9 ची जागा घेण्यासाठी नवीन स्मार्टफोन ऑगस्ट 2019 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो जो स्नॅपड्रॅगॉन 855 SoC आणि 5G सपोर्ट सह येईल. ओरिजिनल Nokia 9 PureView यावर्षी मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. मागील अनेक रिपोर्ट्स मधून माहिती मिळाली आहे कि या स्मार्टफोन मध्ये पेंटा-कॅमेरा सेटअप दिला जाईल आणि डिवाइस मध्ये बारीक बेजल्स असलेला डिस्प्ले दिला जाईल आणि डिवाइस मध्ये नोच डिजाईन नसेल.

टिप्स्टर Nokia_Leaks ने दावा केला आहे कि Nokia 9 PureView च्या उत्तराधिकारी वर पण काम केले जात आहे आणि हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 855 SoC सह येईल तसेच बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन ऑगस्ट 2019 मध्ये 5G सपोर्ट सह येईल.

या स्मार्टफोन मध्ये ट्रू एज-टू-एज QHD (2K) डिस्प्ले असेल ज्यात सेल्फी कॅमेरा साठी डेडिकेटेड कटआउट दिली जाईल. मूळ Nokia 9 पण बारीक बेजल्स असलेल्या फ्लॅट डिस्प्ले सह लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

सॅमसंग ने गेल्यावर्षी चीन मध्ये आपला Galaxy A8s स्मार्टफोन इनफिनिटी-O डिस्प्ले पॅनल सह लॉन्च केलं आहोत ज्यात एक पंच होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला होता. फ्लॅगशिप Galaxy S10 मध्ये पण अशीच डिस्प्ले डिजाइन दिली जाऊ शकते.

टिप्स्टर ने असे पण सांगितले कि या स्मार्टफोन मध्ये पण Nokia 9 PureView प्रमाणे पेंटा-लेंस कॅमेरा सेटअप दिला जाईल. पण पुढील जनरेशनचा मॉडेल असल्यामुळे मोठे सेंसर येऊ शकतात. डिवाइसचा कॅमेरा ओरिजिनल Nokia 9 पेक्षा चांगली इमेज क्वालिटी ऑफर करेल.

अजूनतरी कंपनीने याबद्दल कोणतीही पुष्टि केलेली नाही, कारण अजून Nokia 9 PureView बद्दल पण कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

अशा आहे कि Nokia 9 PureView या महिन्याच्या शेवटी किंवा MWC 2019 म्हणजे पुढील महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. रुमर्स नुसार या स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 6-इंच डिस्प्ले, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिली जाईल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo