Nokia 6.1 4GB रॅम वेरिएंट सेल साठी Amazon वर झाला उपलब्ध
हा भारतात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्स च्या तुलनेत एक स्वस्त डिवाइस आहे जे स्नॅपड्रॅगन 630 SoC आणि 4GB रॅम सह येतात.
HMD ग्लोबल ने काही दिवसांपूर्वी भारतात Nokia 6.1 म्हणजेच Nokia 6 (2018) भारतात लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन देशात 16,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होता पण या वेरिएंट मध्ये फक्त 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज होती, पण आता कंपनी ने या वेरिएंट मध्ये 4GB रॅम ऑफर केली आहे आणि याची किंमत 18,999 रूपये ठेवण्यात आली आहे. हा डिवाइस Amazon समर सेल मध्ये उपलब्ध झाला आहे, आधीच्या वेरिएंट च्या तुलनेत या डिवाइस ची किंमत 2,000 रुपये जास्त आहे. हा भारतात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्स च्या तुलनेत एक स्वस्त डिवाइस आहे जे स्नॅपड्रॅगन 630 SoC आणि 4GB रॅम सह येतात.
डिजाइन
Nokia 6 (2018) स्मार्टफोन च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन भारतात काही बदल करून लॉन्च केला गेला आहे, त्याचप्रमाणे इतर सर्व स्मार्टफोंस मध्ये तुम्हाला काही ना काही फरक नक्की बघायला मिळेल. Nokia 6 (2018) स्मार्टफोन 6000 सीरीज च्या एल्युमीनियम पासून बनवण्यात आला आहे, ज्यामुळे हा खुप ड्यूरेबल आहे.
स्पेसिफिकेशन
सोबत या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला बोथी इफेक्ट पण मिळत आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर पण मिळत आहे, स्मार्टफोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोन फक्त 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पुर्ण चार्ज करू शकता. फोन ब्लू, ब्लॅक आणि आयरन गोल्ड रंगात भारतात सादर केला गेला आहे.
नवीन Nokia 6 स्मार्टफोन एका 5.5-इंचाच्या IPS FHD डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, तसेच यात 4GB ची रॅम सह 32GB/64GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहेत, सोबतच याची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवीत येते. फोन मध्ये एक 16-मेगापिक्सल चा कॅमेरा ड्यूल टोन LED फ्लॅश सह देण्यात आला आहे, याव्यतिरिक्त यात एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण आहे. फोन मध्ये एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी पण देण्यात आली आहे.
ऑफर्स
अमेजॉन इंडिया बद्दल बोलायचे तर कंपनी ने हा स्मार्टफोन काही नवीन ऑफर्स सह लिस्ट केला आहे. त्याचबरोबर भारती एयरटेल कडून तुम्हाला या डिवाइस सोबत Rs 2,000 ची कॅशबॅक ऑफर पण मिळत आहे, तसेच तुम्हाला 31 डिसेंबर 2018 पर्यंत एयरटेल टीवी चे सब्सक्रिप्शन पण मिळत आहे. फोन अमेजॉन इंडिया वरून नो-कॉस्ट EMI ऑप्शन सह पण विकत घेता येईल.
SurveyContent Writer - Marathi View Full Profile