Nokia 5.1, Nokia 3.1 आणि Nokia 2.1 स्मार्टफोंस Nokia India च्या वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होऊ शकतात लॉन्च

Nokia 5.1, Nokia 3.1 आणि Nokia 2.1 स्मार्टफोंस Nokia India च्या वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होऊ शकतात लॉन्च
HIGHLIGHTS

HMD Global ने एप्रिल 2018 मध्ये आपले चार नवीन स्मार्टफोंस लॉन्च केले होते, पण हे स्मार्टफोंस अजूनतरी भारतात लॉन्च करण्यात आले नव्हते.

Nokia 5.1, Nokia 3.1 and Nokia 2.1 Smartphones to Launch in India Soon Listed On Nokia Official Website: HMD Global ने एप्रिल 2018 मध्ये आपले चार नवीन स्मार्टफोंस लॉन्च केले होते, पण हे स्मार्टफोंस अजूनतरी भारतात लॉन्च करण्यात आले नव्हते. परंतु आता असे वाटते आहे की Nokia 5.1, Nokia 3.1 आणि Nokia 2.1 स्मार्टफोंस भारतात लवकरच लॉन्च केले जाऊ शकतात. हे सर्व स्मार्टफोंस भारतातील अधिकृत वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहेत. हे डिवाइस आधीच रशियात लॉन्च करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की हे लवकरच भारतात लॉन्च केले जाऊ शकतात. HMD Global हे स्मार्टफोंस भारतात लॉन्च करणार असली तरी अजून पर्यंत लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. असे होऊ शकते की हे तिन्ही स्मार्टफोंस कंपनी कडून Nokia 6.1 Plus स्मार्टफोन सोबत याच महिन्यात लॉन्च केले जाऊ शकतात. 

Nokia 6.1 Plus स्मार्टफोन Nokia X6 स्मार्टफोन च्या ग्लोबल वेरिएंट च्या स्वरुपात कन्फर्म करण्यात आले आहे, हा डिवाइस सर्वात आधी Hong Kong मध्ये 19 जुलै ला सादर केला जाणार आहे. 

नोकिया 5.1 12,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे, जो 2017 नोकिया 5 चा नवीन वेरिएंट आहे, तर नोकिया 3.1 ची किंमत 9, 498 रुपये असू शकते. नवीन नोकिया 2.1 पण 6,999 रुपयांमध्ये साइट वर लिस्ट आहे, जो जुन्या नोकिया 2 च्या जेनेरेशन चा नवीन मॉडेल आहे. हे लक्षात असू दे की विकत घेण्याचा ऑप्शन नवीन हॅण्डसेट साठी लाइव असला तरी त्यावर क्लिक करताच सध्यातरी आपण संबंधित मागील वर्षीच्या वर्जन वर रीडायरेक्ट होतो. याचा अर्थ असा की नवीन फोन साठी माइक्रोसाइट अजूनही प्रोसेस मध्ये आहे. 

एचएमडी ग्लोबल ने काल मास्को मध्ये एक इवेंट मधून नवीन नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1 स्मार्टफोन लॉन्च केले होते. नोकिया 5.1 आणि नोकिया 3.1 स्मार्टफोंस मध्ये एक मोठा 18: 9 डिस्प्ले आहे, तसेच हे एंड्रॉइड Oreo ऐवजी एंड्रॉइड वन प्रोग्राम वर चालणार आहेत. नवीन नोकिया 2.1 पण नव्या हार्डवेयर सह आला आहे आणि हा Google च्या हलक्या एंड्रॉइड Oreo (गो वर्जन) वर चालतो. 

नोकिया चे म्हणणे आहे की नवीन नोकिया 2.1 आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा 50 टक्के चांगली परफॉर्मन्स देतो. डिवाइस स्नॅपड्रॅगन 425 एसओसी सोबत 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज वर चालतो. यात 5.5 इंचाचा एचडी 16:9 डिस्प्ले आहे आणि यात ड्यूअल फ्रंट स्पीकर्स आहेत, जे वरच्या आणि खालच्या बाजूच्या बेजल वर ठेवण्यात आले आहेत. स्मार्टफोन एंड्रॉइड Oreo (गो वर्जन) वर चालतो. हॅण्डसेट 4000 एमएएच बॅटरी सह येतो, जी दोन दिवसांची बॅटरी लाइफ देऊ शकते आणि यात 5 एमपी फ्रंट फ्रंटिंग सेंसर सह ऑटोफोकस मिळत आहे. तसेच यात एक 8 एमपी चा रीयर कॅमेरा पण मिळतो. हॅण्डसेट जुलै पासून ब्लू/कॉपर, ब्लू/ सिल्वर आणि ग्रे/सिल्वर कलर मॉडेल मध्ये जगभर उपलब्ध होईल. 

Nokia 3.1 स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या 5.2-इंचाच्या HD+ डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, हा 720×1440 पिक्सल सह सादर करण्यात आला आहे. यात मीडियाटेक चा चिपसेट देण्यात आला आहे. याचा क्लॉक स्पीड 1.5GHz चा आहे, तसेच हा एक ओक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोन ची बॉडी पॉलीकार्बोनेट ने बनली आहे जी एल्युमीनियम मिड-फ्रेम सह येते. असेच काहीसे आपण Nokia 3 स्मार्टफोन मध्ये बघितले आहे. पण Nokia 3.1 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेंसर मिळत नाही. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo