6GB रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असलेला नवीन ZTE नूबिया स्मार्टफोन लवकरच होऊ शकतो लॉन्च

HIGHLIGHTS

हा नवीन फोन स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर सह सादर केला जाईल. या फोन मध्ये 6GB चा रॅम पण असू शकतो.

6GB रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असलेला नवीन ZTE नूबिया स्मार्टफोन लवकरच होऊ शकतो लॉन्च

ZTE च्या नूबिया लाइन-अप आपल्या डिजाइन साठी लोकप्रिय आहे. सोबतच हा फोन दमदार चिपसेट सह येतो. Nubia Z17 मध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर देण्यात आला आहे. 
सध्या खबर आहे की, कंपनी आपल्या एका नव्या फ्लॅगशिप डिवाइस वर काम करत आहे. सध्यातरी हा फोन Nubia NX606J च्या नावाने ओळखला जात आहे. हा फोन एनटूटू वर दिसला होता. 
आता एका नवीन लीक मधून NX606J बद्दल काही माहीती समोर आली आहे. हा नवीन फोन स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर सह सादर केला जाईल. या फोन मध्ये 6GB चा रॅम पण असू शकतो. 
तसेच हा फोन एका FHD+ डिस्प्ले सह सादर होऊ शकतो. या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 2160 X 1080 पिक्सल असण्याची शक्यता आहे. हा एंड्राइड ओरिया सह सादर करण्यात येईल. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

सध्यातरी या फोनच्या बाबतीत इतकीच माहिती समोर आली आहे. अशा आहे लवकरच या फोन च्या बाबतीत अजून माहिती समोर येईल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo