चार कॅमेऱ्यांसह येऊ शकतो MOTOROLA ONE PRO

HIGHLIGHTS

चार कॅमेरा असतील मागे

मिळेल वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले

चार कॅमेऱ्यांसह येऊ शकतो MOTOROLA ONE PRO

Motorola ने गेल्या काही महिन्यांपासून आपल्या One सीरीज मध्ये अनेक फोन्स लॉन्च केले आहेत. आता आगामी Motorola One Pro स्मार्टफोनचा पहिला लुक समोर आला आहे. हा मोटोरोला वन स्मार्टफोन सीरीज मध्ये पुढील फोन असण्याची शक्यता आहे. याआधी आपण मोटोरोलाचे One Vision आणि One Power स्मार्टफोन्स बघितले आहेत. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

एक रेंडर मध्ये कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर दिसला आहे तर दुसऱ्या मध्ये असे काहीच दिसले नाही. कदाचित या डिवाइस मध्ये फिजिकल स्कॅनर असेल. तसेच फोन तीन कलर्स मध्ये येऊ शकतो ज्यात डार्क पर्पल, ब्लॅक आयर डार्क ब्रॉंज याचन्ह समावेश असेल. याच्या चारही कडांना बारीक बेजल्स आहेत आणि डिवाइसची चिन इतर बेजल्स पेक्षा मोठी आहे.  

रियर कॅमेऱ्यावर मोठा बंप मिळू शकतो आणि कॅमेरा सेटअप मध्ये एक 48 मेगापिक्सलचा सेंसर मिळण्याची शक्यता आहे. तसेच डुअल-OIS ब्रांडिंग पण मिळू शकते ज्याचा आर्ट असा कि डिवाइस मध्ये दोन लेंस ऑप्टिकली स्टेबलाइज्ड मिळेल. स्मार्टफोन वर एंड्राइड वनची ब्रँडिंग दिसत नाही ज्याचा अर्थ असा कि डिवाइस मध्ये मोटोरोलाचा एंड्राइड वर्जन मिळेल. 

Motorola च्या या नवीन नए फोन बद्दल अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. नावासोबत Pro असल्यामुळे डिवाइस मध्ये फ्लॅगशिप स्पेसिफिकेशंस मिळण्याची आशा आहे.  

वाया 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo