Moto Z3 Play स्मार्टफोन च्या बाबतीत समोर आला लीक रेंडर, बाजुला असू शकतो याचा फिंगरप्रिंट सेंसर

HIGHLIGHTS

एक लीक रेंडर वरून असे समोर आले आहे की Moto Z3 Play स्मार्टफोन मध्ये एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो.

Moto Z3 Play स्मार्टफोन च्या बाबतीत समोर आला लीक रेंडर, बाजुला असू शकतो याचा फिंगरप्रिंट सेंसर

एकीकडे यावर्षीच्या सुरवाती पासून जवळपास सर्व कंपन्यांनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोंस लॉन्च केले आहेत, पण अजूनही एक अशी कंपनी राहिली आहे जिला आपण एक मोठी स्मार्टफोन कंपनी म्हणू शकतो आणि जी आहे पण. लेनोवो-Motorola ने यावर्षी अजूनपर्यंत आपला एकही नवीन स्मार्टफोन लॉन्च केला नाही. 
याआधी या कंपनी ची एक स्मार्टफोन लाइनअप लीक झाली होती. या सीरीज मध्ये Moto Z3 सीरीज पण होती. तसेच यात Moto E5 लाइनअप आणि Moto G6 सीरीज पण होती. याव्यतिरिक्त आता कंपनी च्या या लीक झालेल्या लाइन अप म्हणजे Moto Z3 लाइनअप मधील एक स्मार्टफोन म्हणजे Moto Z3 Play च्या बाबतित एक लीक रेंडर समोर आला आहे. या लीक मध्ये स्मार्टफोन चा एक केस रेंडर समोर आला आहे. तसेच या लीक मध्ये स्मार्टफोन च्या डिजाईन बद्दल पण काही माहिती मिळत आहे. या स्मार्टफोन ला बघून वाटत आहे की कंपनी आपल्या मोड्यूलर डिजाईन ला पुढे चालू ठेवणार आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

याचा अर्थ असा की हा स्मार्टफोन पण मोड्यूल इत्यादी च्या वापरासह लॉन्च केला जाईल. तसेच यात एक मोठा बदल समोर येत आहे, तो हा आहे की या डिवाइस मध्ये फिंगरप्रिंट सेंसर ची जागा बदलली जाऊ शकते. स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर फ्रंट वरून फोनच्या एका बाजूला नेला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त यात एक फुल-स्क्रीन डिस्प्ले पण असू शकतो, जो एका 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह येईल. 
फोन एका ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल, तसेच यात तुम्हाला एक LED फ्लॅश पण मिळत आहे. तुम्हाला यात कॅमेरा मोड्यूल रिंग-टाइप डिजाईन मध्ये मिळत आहे. सोबतच फोन मध्ये बॉटमला एक USB Type C Port मिळत आहे, पण कदाचित मोटोरोला 3.5mm ऑडियो जॅक हटावू शकते. 

 Moto Z3 Play स्मार्टफोन च्या लीक स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एक 6-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळू शकतो, याचे स्क्रीन रेजोल्यूशन 2220×1080 पिक्सल असणार आहे. स्मार्टफोन FCC वर याआधी दिसला होता आणि समोर आलेले की स्मार्टफोन मध्ये एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि 4GB ची रॅम मिळणार आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo