लवकरच लॉन्च होणार्‍या Moto G6 आणि G6 Plus स्मार्टफोंस बद्दल आला हा नवीन लीक

लवकरच लॉन्च होणार्‍या Moto G6 आणि G6 Plus स्मार्टफोंस बद्दल आला हा नवीन लीक
HIGHLIGHTS

या फोटो वरून एकदा पुन्हा डिवाइस बद्दल आलेल्या अफवा स्पष्ट झाल्या आहेत, ज्यावरून समजत आहे की दोन्ही डिवाइस 18:9 एस्पेक्ट रेश्यो च्या LCD डिस्प्ले सह येतील.

Moto G6 आणि G6 Plus च्या लाइव फोटो आणि केस रेंडर्स वरून या डिवाइस बद्दल नवीन लीक समोर आला आहे. ब्राजील मध्ये होणार्‍या लॉन्च इवेंट च्या आधीच Motorola च्या आगामी डिवाइस चे लाइव फोटो दिसले आहेत. त्याचबरोबर डिवाइस च्या कवर वरून याच्या डिजाइन बद्दल माहिती मिळत आहे. 
तसेच केस निर्माता Olixar ने पण MobileFun ला Moto G6 आणि G6 Plus चे लाइव फोटो पाठवले होते. या फोटो वरून एकदा पुन्हा डिवाइस बद्दल आलेल्या अफवा स्पष्ट झाल्या आहेत, ज्यावरून समजत आहे की दोन्ही डिवाइस 18:9 एस्पेक्ट रेश्यो च्या LCD डिस्प्ले सह येतील. बॉटम बेजल्स वर फ्रंट-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि टॉप बेजल्स वर सेल्फी कॅमेरा आहे. विशेष म्हणजे लीक झालेल्या या फोटो मध्ये फिंगरप्रिंट रीडर वर Motorola ची ब्रांडिंग नाही आहे आणि हा डमी यूनिट्स असण्याची शक्यता आहे. 
डिवाइस चा रियर पॅनल पाहता Motorola चा सिग्नेचर सर्कुलर कॅमेरा मोड्यूल आहे आणि अशा आहे की नवीन Moto G6 मध्ये सिंगल रियर कॅमेरा लेंस आणि Plus वेरिएंट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. या लाइव इमेजेस वरून दोन्ही मॉडेल्स ब्लॅक कलर वेरिएंट असल्याचे आणि दुसर्‍या रेंडर वरून रेगुलर G6 च्या गोल्ड कलर वेरिएंट ची माहिती मिळत आहे. मागील रिपोर्ट्स नुसार रोज गोल्ड आणि सिल्वर वेरिएंट्स वर पण काम चालू आहे. 

अजून कंपनी कडून या डिवाइसे ची किंमत आणि उपलब्धता बद्दल माहिती येणे बाकी आहे पण हे डिवाइस बजेट स्मार्टफोन Moto G6 Play सह सादर केले जातील. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo