मोटो G4 स्मार्टफोन झाला भारतात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत ,१२,४९९ रुपये

HIGHLIGHTS

मोटो G4 स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

मोटो G4 स्मार्टफोन झाला भारतात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत ,१२,४९९ रुपये

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा मोटो G4 १२,४९९ रुपयात

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

मोटो G4 प्लसला भारतात लाँच केल्यानंतर, आता मोटो G4 स्मार्टफोनसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीने भारतीय बाजारात ह्या स्मार्टफोनची किंमत १२,४९९ रुपये ठेवली आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ह्या स्मार्टफोनला मे मध्ये मोटो G4 प्लससह लाँच केले गेले होते. मोटो G4 प्लस (2GB रॅम/16GB स्टोरेज व्हर्जन) ची किंमत १३,४९९ रुपये आहे. ह्याच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हर्जनची किंमत १४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
 

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD 1080×1920 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 401 ppi आहे. ह्याची डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह लाँच केली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617 MSM8952 प्रोसेसर दिला गेला आहे. तसेच ह्यात 2GB ची रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. जे आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील वाचा – ७००० रुपयांच्या किंमतीत येणारे ५ उत्कृष्ट स्मार्टफोन्स

ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा अॅनड्रॉईड 6.0.1 वर चालतो आणि ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली आहे. ह्याचे वजन १५५.०० ग्रॅम आहे. ह्यात 3G आणि 4G सपोर्टसुद्धा आहे.

हेदेखील वाचा – अल्टीमेट ईयर्स UE बूम 2 स्पीकर लाँच, किंमत १५,९९५ रुपये
हेदेखील वाचा – 
HTC डिझायर 630 स्मार्टफोन भारतात झाला विक्रीसाठी उपलब्ध

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo