Xiaomi Mi 5, Redmi 6 आणि Redmi 6A स्मार्टफोन मध्ये आला MIUI 10, हे नवीन फीचर्स आले आहेत फोन मध्ये

Xiaomi Mi 5, Redmi 6 आणि Redmi 6A स्मार्टफोन मध्ये आला MIUI 10, हे नवीन फीचर्स आले आहेत फोन मध्ये
HIGHLIGHTS

MIUI 10 चा हा नवीन अपडेट या स्मार्टफोंस वर अल्फा आणि डेवेलपर ROM च्या आधारावर जारी करण्यात आला आहे.

MIUI 10 Arrives on Xiaomi Mi 5 Xiaomi Redmi 6 and Xiaomi Redmi 6a as Alpha and Beta: Xiaomi MIUI 10 ची घोषणा होऊन जवळपास 1 महीना होत आहे, हा नवीन प्लॅटफार्म कंपनी ने पहिल्यांदा 31 मे ला लॉन्च केला होता. या प्लॅटफार्म सोबत कंपनी ने आपले Mi 8 आणि Mi 8SE स्मार्टफोंस पण सादर केले होते. या प्लॅटफार्म च्या लॉन्च नंतर हा अनेक Mi स्मार्टफोंस वर अल्फा, क्लोज्ड बीटा आणि बीटा अपडेट च्या रुपात दिसला आहे. आता हा नवीन अपडेट काही जुन्या स्मार्टफोंस म्हणजे Mi 5 आणि काही दिवसांपूर्वी कंपनी ने चीन मध्ये लॉन्च केलेल्या Redmi 6 आणि Redmi 6A स्मार्टफोंस साठी जारी झाला आहे. 

हा अपडेट कंपनी कडून त्यांचा Mi 5 स्मार्टफोन पर एक अल्फा ROM च्या रुपात देण्यात आला आहे, तसेच Xiaomi Redmi 6 आणि Redmi 6A स्मार्टफोंस साठी हा चाइना डेवलपर ROM च्या रुपात जारी करण्यात आला आहे. या दोन्ही रिलीज टाइप मध्ये सर्वात मोठा बदल यांच्या नावावरून दिसून येतो. Alpha ROM मध्ये डेवलपर ROM पेक्षा जास्त बग असू शकतात. 

याआधी समोर आलेल्या माहितीनुसार आता काही दिवसांपूर्वीच Xiaomi ने स्मार्टफोंस ची एक लिस्ट जारी केली होती, यांच्यावर MIUI 10 चा बीटा वर्जन जारी करण्यात आला होता. 

आमच्या माहितीनुसार काही स्मार्टफोंस वर याचा बीटा वर्जन आता चालत आहे, तसेच काही फोंस असे पण आहेत जे या अपडेट साठी एलिजिबल आहेत. या स्मार्टफोंस मध्ये Mi MIX 2, Mi 6, Mi 5s Plus, Mi 5s, Mi 5, Mi 4, Mi 3, Mi Note 2, Mi Max 2, Mi Max, Redmi Note 5 इंडिया, Redmi Note 5 Pro, Redmi Note 5A, Redmi Note 5A Prime, Redmi Note 4 MTK, Redmi Note 4X, Redmi Note 3 Qualcomm, Redmi 5, Redmi 5A, Redmi 4, Redmi 4A, Redmi 3S, Redmi Y2, Redmi Y1 Lite, Redmi Y1 यांचा समावेश आहे. 

Xiaomi च्या या नवीन ROM मध्ये तुम्हाला डिजाईन च्या बाबतीत भरपूर बदल दिसतील, तसेच यावेळी कंपनी ने AI इंटीग्रेशन वर जास्त लक्ष दिले आहे. या नवीन ROM मध्ये जो सर्वात खास फीचर वाटतो, तो म्हणजे AI portrait mode. कंपनी चे म्हणेन आहे की यामुळे Bokeh Images च्या क्षमतेत वाढ होईल, तसेच सिंगल किंवा ड्यूल दोन्ही प्रकारच्या कॅमेरा सोबत हा काम करेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo