मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क 3 स्मार्टफोन लाँच: किंमत ४,९९९ रुपये

मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क 3 स्मार्टफोन लाँच: किंमत ४,९९९ रुपये
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनची किंमत ४,९९९ रुपये ठरविण्यात आली आहे. हा ७ एप्रिलपासून स्नॅपडीलच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.

ह्या स्मार्टफोनला कंपनीने अलीकडेच आपल्या वेबसाइटवर लिस्ट केले होते. आणि बुधवारी हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क 3 ची किंमत ४,९९९ रुपये ठरविण्यात आली आहे. हा ७ एप्रिलपासून स्नॅपडीलच्या माध्यमातून मिळणे सुरु होईल. तथापि ह्याच्या पहिल्या सेलसाठी १ एप्रिलपासून रजिस्ट्रेशन सुरु होईल.

 

हा स्मार्टफोन ड्यूल सिम सह अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. त्याशिवाय ह्यात 5.5 इंचाची HD 720×1280 पिक्सेलची IPS डिस्प्ले आणि गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आहे. ह्यात आपल्याला 1GB ची रॅमसुद्धा मिळत आहे.

फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. ह्यात आपल्याला 2500mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये आपल्याला 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. फोनमध्ये आपल्याला आधीपासूनच काही खास अॅप्ससुद्धा देण्यात आले आहेत, जसे की OLX, स्काइप आणि Gaana

 

हेदेखील वाचा – एसर क्रोमबुक 14 लॅपटॉप: १४ तासांपर्यंत देणार बॅटरी लाइफ

हेदेखील वाचा – फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज असलेला जिओनी W909 फ्लिप फोन लाँच

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo