मायक्रोमॅक्स कॅनवास अमेज 2 स्मार्टफोन लाँच, 2GB रॅमने सुसज्ज

HIGHLIGHTS

कंपनीचा दावा आहे की, ह्या फोनची डिस्प्ले WOB तंत्रज्ञानाने बनवला गेला आहे, ज्याच्या माध्यमातून डिस्प्ले तुटल्यावरसुद्धा यूजर हा फोन वापरु शकतात.

मायक्रोमॅक्स कॅनवास अमेज 2 स्मार्टफोन लाँच, 2GB रॅमने सुसज्ज

फ्लिपकार्टवर खरेदी करा मायक्रोमॅक्स कॅनवास अमेज 2 ७,९९९ रुपयात

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने बाजारात आपला नवीन फोन कॅनवास अमेज 2 लाँच केला आहे. हा नवीन फोन मागील वर्षी लाँच केल्या गेलेल्या कॅनवास अमेजचा पुढील व्हर्जन आहे. कॅनवास अमेज 2 ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर ओपन सेलमध्ये उपलब्ध होईल. ह्याची किंमत ७,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा ९ जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

जर ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 ने सुसज्ज आहे. ह्यात 1.4GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB च्या DDR3 रॅम दिली आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.

हेदेखील पाहा – लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक
 

ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरासुद्धा दिला आहे. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा 4G सपोर्टसह येतो. ह्यात 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा वायफाय आणि ब्लूटुथ कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे.

 

हेदेखील वाचा – LeMall ह्या शॉपिंग पोर्टलवर केवळ १ रुपयात मिळतोय LeEco Le 2 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – २०१७ च्या सुरुवातीला सॅमसंग लाँच करु शकतो आपला बेंडेबल स्क्रीन असलेले स्मार्टफोन्स:ब्लूमबर्ग

 

Content Writer - Marathi View Full Profile