मिजू M3 नोट: 4100mAh क्षमतेची बॅटरी लाइफ देणारा स्मार्टफोन

मिजू M3 नोट: 4100mAh क्षमतेची बॅटरी लाइफ देणारा स्मार्टफोन
HIGHLIGHTS

मिजूने आपला नवीन स्मार्टफोन मिजू M3 नोट लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5.5 इंचाची डिस्प्ले दिली आहे. त्याचबरोबर ह्यात 4100mAh ची बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मिजूचा नवीन स्मार्टफोन M3 नोट बुधवारी लाँच झाला. हा स्मार्टफोन येत्या सोमवारपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याच्या पहिल्या सेलसाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. स्मार्टफोनला दोन प्रकारात लाँच केले गेले आहे, ज्याचे पहिले व्हर्जन 2GB रॅम आणि 16B च्या अंतर्गत स्टोरेजचे असेल. ह्याची किंमत CNY 799 जवळपास ८,२०० रुपयाच्या आसपास आणि दुसरा व्हर्जन 3GB रॅम आणि 32GB स्टोेरज असलेल्या स्मार्टफोनची किंमत CNY 999 जवळपास १०,३०० रुपये आहे.

 

हा स्मार्टफोन फ्लाईमी ओएस अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला ड्यूल सिम सपोर्टसुद्धा मिळत आहे. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची 1080×1920 पिक्सेल LTPS डिस्प्ले 403ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिले गेले आहे, जे 1.8GHz गती देतो. त्याचबरोबर ह्यात 2GB आणि 3GB च्या LPDDR3 रॅम दिली गेली आहे. त्याशिवाय ह्यात दिलेल्या अंतर्गत स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो.

हे पाहा – भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चर आणि PDAF ऑटोफोकसह दिला गेला आहे. त्याशिवाय ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे जो f/2.0 अॅपर्चरने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये एक mTouch 2.1 तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे. कंपनीनुसार हा फिंगरप्रिंट सेंसर खूपच उत्कृष्ट आणि तेज आहे. त्याशिवाय ह्यात 4100mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, वायफाय 802.11 a/b/g/n, ब्लूटुथ 4.0 सह BLE आणि GPS/A-GPS पर्यायासह दिला आहे.

 

हेदेखील वाचा – HP ने आणला जगातील सर्वात बारीक लॅपटॉप HP Spectre 13

हेदेखील वाचा – अॅमेझॉन पुढील आठवड्यात लाँच करेल नवीन जेनरेशन किंडल डिवाइस

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo