Meizu 15 Plus स्मार्टफोन Exynos 8895 प्रोसेसर सह AnTuTu वर दिसला

Meizu 15 Plus स्मार्टफोन Exynos 8895 प्रोसेसर सह AnTuTu वर दिसला
HIGHLIGHTS

Meizu 15 Plus स्मार्टफोन या बेंचमार्किंग साईट वर दिसला आहे, यासोबतच याचा कॅमेरा सँपल पण लीक झाले आहेत.

Meizu आपले तीन स्मार्टफोंस चीन मध्ये 22 एप्रिलला लॉन्च करू शकते. या स्मार्टफोंस मध्ये Meizu 15, Meizu 15 Lite आणि Meizu 15 Plus स्मार्टफोन यांचा समावेश आहे. या इवेंट चे आयोजन चीन मध्ये 7:30 वाजता केले जाणार आहे, म्हणजे हे डिवाइस भारतीय वेळे नुसार 5:00 वाजता लॉन्च केले जातील. आम्ही या स्मार्टफोंस बद्दल कालच माहिती दिली होती. पण आता एका नवीन माहितीनुसार, Meizu 15 Plus स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट AnTuTu वर दिसला आहे. 
या लिस्टिंग वरून समोर येत आहे की डिवाइस एक्सीनोस 8895 ओक्टा-कोर चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर यात एक 6GB च्या रॅम सह 64GB ची स्टोरेज असणार आहे. 
जर मिजू 15 लाइट स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर याच्या बद्दल दिवसांपासून माहिती समोर येत होती, हा डिवाइस एका 5.46-इंचाच्या IPS LCD डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा एक FHD+ पॅनल असेल, जो 2160×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह येईल. त्याचबरोबर असा अंदाज लावला जात आहे की हा डिवाइस तीन वेगवेगळ्या स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, जो 3GB रॅम 32GB स्टोरेज, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह 6GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज आहे. 
फोन मध्ये सॅमसंग चा एक्सीनोस चिपसेट किंवा स्नॅपड्रॅगन चिपसेट असण्याची शक्यता आहे. फोन मध्ये एक 12-मेगापिक्सल च्या कॅमेरा सह एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी पण असू शकते. 
प्लस वेरिएंट बद्दल बोलायला गेलो तर या डिवाइस बद्दल पण खुप काही समोर आले आहे, कंपनी याला एका 5.95-इंचाच्या AMOLED डिस्प्ले आणि 2560×1440 पिक्सल रेजोल्यूशन सह लॉन्च करू शकते. यात तुम्हाला एक 3,430mAh क्षमता असलेली बॅटरी मिळू शकते. त्याचबरोबर यात एक ड्यूल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता पण आहे. 
त्याचबरोबर Meizu 15 स्मार्टफोन पाहता असे बोलले जात आहे की यात एक 5.46-इंचाचा एक AMOLED डिस्प्ले असू शकतो, हा एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले असेल. तसेच यात एक 12-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा कॅमेरा कॉम्बो असू शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo