3000mAh क्षमता असलेला एलजी G4 स्टायलस 3G स्मार्टफोन लाँच

HIGHLIGHTS

एलजी इंडियाने आपला G4 स्टायलसचा नवीन व्हर्जन लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनला एलजी G4 स्टायलस 3Gच्या नावाने लाँच केला गेला आहे. ह्याची किंमत १९,००० रुपये आहे.

3000mAh क्षमता असलेला एलजी G4 स्टायलस 3G स्मार्टफोन लाँच

एलजी इंडियाने आपल्या G4 स्टायलसचा नवीन व्हर्जन लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनला एलजी G4 स्टायलस 3G च्या नावाने लाँच केले गेले आहे. ह्याची किंमत १९,००० रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आता कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्ट केले गेले आहे. येथे G4 स्टायलसच्या 3G व्हर्जनविषयी माहिती दिली गेली आहे. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात उपलब्ध केला जाईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

ह्या स्मार्टफोनमध्ये मागील स्मार्टफोनपेक्षा थोडेसेच बदल पाहायला मिळत आहे. 4G LTE सपोर्टशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये कमीच बदल पाहायला मिळत आहे. मागील स्मार्टफोनमध्ये 1.2Ghz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 400 प्रोसेसर दिला गेला होता. तर ह्या स्मार्टफोनमध्ये 1.4Ghz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6592M प्रोसेसर आहे. त्याशिवाय ह्या LTE व्हर्जनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा होता तर ह्या स्मार्टफोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा दिला गेला आहे. दोन्हीही स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. त्याशिवाय इतर  सर्व वैशिष्ट्य मिळतेजुळते आहे.

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर आधारित आहे. आणि ह्यात 5.7 इंचाची HD 720×1280 पिक्सेलची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 258ppi आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 1GB ची रॅम, 16GB चे अंतर्गत स्टोरेज ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. आणि ह्यात 3000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये वायफाय 802.11 a/b/g/n, ब्लूटुथ, 4.1, NFC, A-GPS, ग्लोनास आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट दिला गेला आहे.

ह्याआधी कंपनीने एलजी G4 स्टायलस बाजारात आणला होता, ज्यात हे स्पेक्स दिले गेले होते. ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 5.7 इंचाची IPS डिस्प्ले 720×1280 पिक्सेल रिझोल्युशन सह दिली गेली आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 1.2GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसरसह 1GB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे. हा फॅबलेट अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.

Ashvani Kumar

Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo