लेनोवोच्या वाइब P1M स्मार्टफोनची किंमत झाली कमी
आता हा फोन ६,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे. ह्या फोनमध्ये १००० रुपयाची घट झाली आहे.
फ्लिपकार्टवर खरेदी करा लेनोवो वाइब P1m ६,९९९ रुपयात
Surveyमोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लेनोवोने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात वाइब P1M स्मार्टफोन लाँच केला होता. ह्या फोनला भारतात ७,९९९ रुपयात लाँच केले गेले होते. आता ह्या फोनच्या किंमतीत घट झाली आहे. आता हा फोन ६,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे. ह्या फोनवर १००० रुपयाची घट झाली आहे. ह्या फोनला ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर खरेदी केले जाऊ शकते.
ह्या स्मार्टफोनमध्ये 3900mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी १६ तासांचा टॉकटाईम देण्यास सक्षम आहे. ह्याच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर ह्यात 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 प्रोसेसर आणि 2GB ची रॅमसुद्धा मिळत आहे.
हेदेखील वाचा – नेक्स्टबिट रॉबिन प्रतिक्रिया
हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
हेदेखील वाचा – मार्क झुकरबर्गचा पिनटेरेस्ट आणि ट्विटर अकाउंट हॅक
हेदेखील वाचा – महिंद्रा eVerito इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, किंमत ९.५० लाखांपासून सुरु
Content Writer - Marathi View Full Profile