Lenovo K5 आणि K5 Play स्मार्टफोन ड्यूल कॅमेरा सह झाले लॉन्च: किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

HIGHLIGHTS

Lenovo K5 आणि Lenovo K5 Play स्मार्टफोन अफोर्डेबल किंमत, मॉडर्न डिजाईन आणि ड्यूल कॅमेरा सह लॉन्च झाले आहेत.

Lenovo K5 आणि K5 Play स्मार्टफोन ड्यूल कॅमेरा सह झाले लॉन्च: किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Lenovo ने मागच्या आठवड्यातच चीन मध्ये आपला पहिला थिन बेजल डिजाईन वाला स्मार्टफोन Lenovo S5 स्मार्टफोन नावाने लॉन्च केला होता. आता कंपनी ने आपले दोन नवीन स्मार्टफोंस पण लॉन्च केले आहेत. कंपनी ने आपल्या वेबसाइट वर Lenovo K5 आणि K5 Play स्मार्टफोन लिस्ट केले आहेत. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Lenovo K5 आणि Lenovo K5 Play स्मार्टफोन Lenovo S5 स्मार्टफोन शी मिळत्याजुळत्या डिजाईन सह लॉन्च करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त या दोन्ही नवीन स्मार्टफोंस बद्दल बोलायाचे झाले तर Lenovo K5 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.7-इंचाचा LCD डिस्प्ले 1440×720 पिक्सल रेजोल्यूशन असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या स्क्रीन सह लॉन्च झाला आहे. 

स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक MT6750 प्रोसेसर मिळत आहे, याची क्लॉक स्पीड 1.5GHz आहे. सोबतच या स्मार्टफोन मध्ये 3GB ची रॅम आणि 32GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने वाढवू शकता. स्मार्टफोन एंड्राइड नौगट सह लॉन्च करण्यात आला आहे, यातील कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल चा प्रायमरी आणि 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा मिळत आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेल्फी साठी मिळत आहे. 
फोन मध्ये तुम्हाला एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, तसेच याला RMB 899 म्हणजे जवळपास Rs 9,000 च्या किंमतीत प्री-आर्डर केले जाऊ शकते. हा स्मार्टफोन 10 एप्रिल पासून सेल साठी उपलब्ध केला जाणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ब्लॅक आणि ब्लू रंगात घेऊ शकता. 

तसेच Lenovo K5 Play स्मार्टफोन बद्दल बोलायाचे झाले तर याला तुम्ही RMB 699 म्हणजे जवळपास Rs 7,000 मध्ये घेऊ शकता. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.7-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळत आहे आणि हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या वेरिएंटस मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, याला तुम्ही 2GB रॅम आणि 16GB च्या स्टोरेज आणि 3GB रॅम आणि 32GB च्या स्टोरेज सह विकत घेऊ शकता. ही स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने वाढवू शकता. 

या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफी साठी तुम्हाला एक ड्यूल कॅमेरा मिळत आहे, जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा कॅमेरा कॉम्बो आहे, सोबतच स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टफोन 17 एप्रिल पासून सेल साठी येणार आहे, यासाठी प्री-आर्डर सुरू झाली आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo