लेनोवो K5 नोट स्मार्टफोन लाँच

लेनोवो K5 नोट स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

काही आठवड्यांपूर्वी लेनोवो K4 नोट बाजारात आणल्यानंतर आता कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लेनोवो K5 नोट लाँच केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे.

लेनोवोने चीनच्या बाजारात आपला नवीन स्मार्टफोन K5 नोट लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत CNY 1099(जवळपास ११,३५० रुपये) ठेवण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या होमलँडवर लवकरच विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. लेनोवो K4 नोट प्रमाणे ह्या स्मार्टफोनलासुद्धा फ्लॅश सेलच्या माध्यमातून विकले जाईल, मात्र आता हा केवळ चीनमध्ये उपलब्ध होईल. तथापि, चीन बाहेर हा स्मार्टफोन कधी लाँच केला जाईल, ह्याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

 

ह्या स्मार्टफोनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात K4 नोट पेक्षा बरेच बदल पाहायला मिळतील. ह्या स्मार्टफोनला पुर्ण मेटल बॉडीसह लाँच केले गेले आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनची दुसरी सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याचे फिंगरप्रिंट स्कॅनर.मात्र असेच एक सेंसर K4 नोटमध्येही होते. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये डॉल्बी अटमोसचे स्पीकर्ससुद्धा दिले गेले आहेत. जे K4 नोटचे सुद्धा खास फीचर होते.

स्मार्टफोनमध्ये 64-बिटचे ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिले गेले आहे, जे 1.8GHz ची गती देतो. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 2GB ची रॅमसुद्धा आहे. फोनमध्ये माली-T860 GPU सुद्धा दिला गेला आहे. फोनमध्ये आपल्याला 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

डयूल-समि ड्यूल-4G सुसज्ज असलेल्या ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD 1080×1920 पिक्सेल IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ही डिस्प्ले लेनोवो K4 नोटमध्ये सुद्धा दिली गेली होती. लेनोवो K5 नोटमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा PDAF ऑटोफोकस, f/2.2 अॅपर्चर आणि ड्यूल-टोन फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याशिवाय फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE सपोर्टसह GPRS/EDGS, 3G, A-GPS, ब्लूटुथ ४.०, मायक्रो-USB आणि FM रेडियोसुद्धा आहे.

हेदेखील वाचा- अॅनड्रॉईडसोबत विंडोज १०वरसुद्धा चालणार नोकिया C1 स्मार्टफोन

ह्या स्लाइड शो जरुर पाहा-  हे १० अॅप्स तरुण पिढीच्या फोनमध्ये असलेच पाहिजे

हे देखील वाचा- भारतात २८ जानेवारीला लाँच होणार ब्लॅकबेरीचा पहिला अॅनड्रॉईड प्रीव

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo