१२ मे ला होणार LeEco Le 1S Eco स्मार्टफोनचा फ्लॅश सेल, किंमत ९,९९९ रुपये

१२ मे ला होणार LeEco Le 1S Eco स्मार्टफोनचा फ्लॅश सेल, किंमत ९,९९९ रुपये
HIGHLIGHTS

LeEco Le 1S Eco स्मार्टफोनची फ्लॅश सेल १२ मे ला दुपारी २ वाजल्यापासून सुरु होईल. ह्या फोनसह ४९०० रुपयात एक वर्षाची मेंबरशिपसुद्धा दिली जात आहे.

LeEco Le 1S Eco स्मार्टफोनचा फ्लॅश सेल १२ मे ला दुपारी २ वाजता सुरु होईल. ह्या फ्लॅश सेलसाठी १२ मे दुपारी १ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल. ह्या सेलमध्ये LeEco Le 1S Eco स्मार्टफोन ९९९९ रुपयात मिळत आहे. त्याचबरोबर कंपनी ४९०० रुपयात मेंबरशिपसुद्धा देत आहे. ह्या स्मार्टफोनला आपण ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करु शकता. फ्लॅश सेलसुद्धा फ्लिपकार्ट आयोजित केला आहे.
 

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD डिस्प्ले दिली आहे. हा स्मार्टफोन 3GB रॅमसह लाँच केला आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.85 GHz मिडियाटेक हेलिओ X10 ऑक्टा-कोर प्रोसेसरसुद्धा आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि हा अॅनड्रॉईड v5.0.2 वर काम करतो, जो EUI 5.5 सह येतो.

हेदेखील वाचा – मोटोरोला मोटो X 2016 चे नवीन फोटो लीक
हेदेखील वाचा – 
१३ मेगापिक्सेलच्या कॅमे-याने सुसज्ज आहे लेनोवो ZUK Z1 स्मार्टफोन

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo