3G सपोर्टने सुसज्ज असलेला कार्बन A91 स्टॉर्म स्मार्टफोन लाँच

3G सपोर्टने सुसज्ज असलेला कार्बन A91 स्टॉर्म स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

कार्बन A91 स्टॉर्म स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम आणि 3G सपोर्ट आहे.

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा कार्बन A91 २,८९९ रुपयात

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी कार्बनने बाजारात आपला नवीन फोन A91 स्टॉर्म लाँच केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे. ह्याच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल. ह्याची किंमत आहे २,८९९ रुपये. हा निळा, पांढरा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.

 

ह्या स्मार्टफोनमध्ये ४ इंचाची डिस्प्ले दिली आहे. हा एक WVGA डिस्प्ले आहे आणि ह्याचे रिझोल्युशन 800×480 पिक्सेल आहे. हा 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 512MB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 4GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
 

हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स

ह्यात २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात एक VGA फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. फोनमध्ये 2200mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी ८ तासांचा टॉकटाइम देईल. ह्यात 3G, ड्यूल सिम, ब्लूटुथ, वायफाय, ऑडियो जॅकसारखे फीचर्ससुद्धा आहेत. हा एक अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

हेदेखील वाचा – “फ्रीडम 251” स्मार्टफोनची डिलिवरी लांबणीवर, ६ जुलैपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा
हेदेखील वाचा – HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनची किंमत झाली कमी

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo