जोला C स्मार्टफोन लाँच, सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम 2.0 ने सुसज्ज

HIGHLIGHTS

ह्यात स्नॅपड्रॅगन 212 क्वाड-कोर प्रोसेसर आहे. ह्यात 2GB चे रॅमसुद्धा आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असेल. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवले जाऊ शकते.

जोला C स्मार्टफोन लाँच, सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम 2.0 ने सुसज्ज

सेलफिश ऑपरेटिंग सिस्टमला बनवणारी कंपनी जोलाने बाजारात आपल्या ऑपरेटिंग सिस्टमला लोकप्रिय बनवण्याच्या उद्देशाने बाजारात एक नवीन फोन जोला C लाँच केला आहे. जोला C स्मार्टफोन सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम 2.0 ने सुसज्ज आहे. जोला C स्मार्टफोनची किंमत EUR 169 ठेवण्यात आली आहे आणि हा आता केवळ फिनलँडमध्ये लाँच केला आहे.
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

जोला C च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. ह्यात स्नॅपड्रॅगन 212 क्वाड-कोर प्रोसेसर आहे. ह्यात 2GB रॅमसुद्धा देण्यात आली आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवले जाऊ शकते. फोनमध्ये 2500mAh ची बॅटरी सुद्धा देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा – २०,००० च्या किंमतीत येणारे आकर्षक स्मार्टफोन्स (मे २०१६)

फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा दिला गेला आहे. रियर कॅमेरा LED फ्लॅशसह येतो. ह्यात 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आहे. ह्या फोनचा आकार 142x72x9.6mm आहे आणि ह्याचे वजन 150 ग्रॅम आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे, जो 4G LTE ला सपोर्ट करतो.

हेदेखील वाचा – मोटोरोलाचा सर्वाधिक लोकप्रिय असलेला फोन मोटो रेजरची रिएन्ट्री
हेदेखील वाचा – ७००० रुपये किंमतीत येणा-या ह्या स्मार्टफोनमध्ये कोण आहे सरस?

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo