1 वर्षाच्या वैधते सह BSNL ने 1,999 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान केला सादर

1 वर्षाच्या वैधते सह BSNL ने 1,999 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान केला सादर
HIGHLIGHTS

BSNL ने हा प्रीपेड प्लान तामिळनाडू आणि चेन्नई सर्कल मध्ये एक प्रमोशनल प्लान म्हणून सादर केला आहे.

BSNL Launched new Prepaid Plan of Rs, 1,999 with One Year Validity: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने 1,999 रुपयांचा प्रीपेड प्लान सादर का आहे, हा प्लान तामिळनाडू आणि चेन्नई सर्कल मध्ये लॉन्च केला आहे आणि या प्लान अंतर्गत यूजर्सना एका वर्षासाठी डाटा आणि वॉयस कॉल बेनिफिट मिळत आहेत. 1,999 रुपयांचा हा कॉम्बो प्लान फक्त वर सांगितलेल्या सर्कल मध्ये उपलब्ध आहे. या प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 2GB डाटा मिळेल जो 365 दिवसांमध्ये 730GB डेटा होतो. या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग पण मिळत आहे. या प्लान मधून BSNL रिलायंस जियो आणि एयरटेल ला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर्स पेक्षा जास्त बेनिफिट देत आहे. 

BSNL ने हा प्लान या सर्कल मध्ये प्रमोशनल बेसिस वर लॉन्च केला आहे आणि हा 22 सप्टेंबर 2018 पर्यंत वैध आहे. कंपनी या प्लान मध्ये प्रतिदिन 2GB डेटा देत आहे आणि या प्लान मध्ये प्रति GB चा दर 2.73 रूपये एवढा आहे. या प्लान मध्ये यूजर्सना मिळणार्‍या अनलिमिटेड वॉयस कॉल्स सोबत कोणतीही FUP लिमिट नाही पण ही फ्री कॉलिंग दिल्ली आणि मुंबई मधून करता येणार नाही कारण या दोन्ही सर्कल मध्ये BSNL ऑपरेट करत नाही. त्याचबरोबर यूजर्सना प्रतिदिन 100 SMS मिळतील.  

हा प्रमोशनल प्लान चेन्नई आणि तामिळनाडू मध्ये सादर करण्यात आला आहे. अन्य सर्कल च्या यूजर्सना अजूनतरी याची वाट बघावी लागेल.  
रिलायंस जियो पण 1,999 रुपयांच्या टॅरिफ प्लान देत आहे पण या प्लान ची वैधता फक्त 180 दिवस आहे. जियो च्या या प्लान मध्ये 125GB डेटा मिळत आहे आणि यात कोणतीही FUP लिमिट नाही, त्याचबरोबर यूजर्सना प्रतिदिन 100 SMS आणि अनलिमिटेड वॉयस कॉल्स मिळत आहेत. सोबतच यूजर्सना जियो अॅप्स आणि जियो ट्यून चे फ्री सब्सक्रिप्शन पण मिळत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo