Intex Infie 3 स्मार्टफोन एंड्राइड Oreo (Go Edition) सह फक्त Rs 4,649 मध्ये झाला लॉन्च

Intex Infie 3 स्मार्टफोन एंड्राइड Oreo (Go Edition) सह फक्त Rs 4,649 मध्ये झाला लॉन्च
HIGHLIGHTS

Intex ने बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत, हे कंपनी च्या Infie लाइनअप मध्ये लॉन्च केलेले नवीन स्मार्टफोन्स आहेत.

Intex ने बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत, हे कंपनी च्या Infie लाइनअप मध्ये लॉन्च केलेले नवीन स्मार्टफोन्स आहेत. इंटेक्स Infie 3 आणि Intex Infie 33 स्मार्टफोन्स हैदराबाद मध्ये झालेल्या एक इवेंट नंतर लॉन्च करण्यात आले आहे. Infie 3 इंटेक्स ने लॉन्च केलेला पहिला असा स्मार्टफोन आहे जो एंड्राइड Go डिवाइस म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. तसेच Infie 33 स्मार्टफोन एंड्राइड नौगट वर चालतो. दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये तुम्हाला 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले मिळत आहे, तसेच यात 4G VoLTE पण आहे. 
हे दोन्ही स्मार्टफोन्स त्या लोकांसाठी लॉन्च करण्यात आले आहेत जे एक असा स्मार्टफोन शोधत आहेत, जो एक बेसिक स्मार्टफोन वाल्या सर्व फीचर्स सह लॉन्च केला जातो. इंटेक्स Infie 3 आणि Intex Infie 33 स्मार्टफोन ऑफलाइन बाजारात देशभरात सेल केला जाणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स काही रंगांच्या ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे. 

Intex Infie 3 चे स्पेसिफिकेशन्स
Intex Infie 3 स्मार्टफोन कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे, जो एंड्राइड 8.1 Oreo (Go Edition) वर लॉन्च करण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला एक 4.95-इंचाचा FWVGA+ डिस्प्ले मिळत आहे, जो 480×960 पिक्सल रेजोल्यूशन वाल्या 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह येतो. Intex ने या डिस्प्ले ला एक FULLVIEW डिस्प्ले म्हटले आहे. Intex Infie 3 स्मार्टफोन मध्ये एक 1.1GHz चा क्वॉड-कोर चिपसेट मिळत आहे, तसेच यात 1GB रॅम सह 8GB ची इंटरनल स्टोरेज पण आहे. 
Intex Infie 3 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा LED फ्लॅश सह मिळत आहे, तसेच यात 2-मेगापिक्सल चा एक फ्रंट कॅमेरा आहे. फोन मधील कनेक्टिविटी ऑप्शन्स पाहता Intex Infie 3 मध्ये तुम्हाला 4G LTE, VoLTE, वाई-फाई 802.11 b/g/n, ब्लूटूथ 4.0, GPS, आणि Micro USB Port मिळत आहेत. फोन मध्ये तुम्हाला 2,000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. 

Intex Infie 33 चे स्पेसिफिकेशन्स
Intex Infie 33 डिवाइस काही बेटर स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च करण्यात आला आहे, याची Infie 3 सोबत तुलना केल्यास हा डिवाइस म्हणजे Intex Infie 33 स्मार्टफोन एंड्राइड 7.1 नौगट सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच या डिवाइस मध्ये एक 5.34-इंचाचा FWVGA+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये एक 1.3GHz चा क्वॉड-कोर प्रोसेसर मिळत आहे. Infie 33 मध्ये तुम्हाला 1GB रॅम सह 8GB इंटरनल स्टोरेज मिळत आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवू शकता. 
Intex Infie 33 स्मार्टफोन कॅमेरा बद्दल बोलायचे तर यात 5-मेगापिक्सल चा रियर आणि 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे. 

Intex Infie 3 आणि Intex Infie 33 ची किंमत आणि उपलब्धता
तुम्हाला माहितीच आहे की Intex ने हि माहिती आधीच दिली आहे की हे देशभरात ऑफलाइन बाजारात सेल साठी उपलब्ध होतील. Intex Infie 33 बद्दल बोलायचे तर हा तिन कलर ऑप्शन्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, हा डिवाइस तुम्ही ब्लॅक, ब्लू आणि शॅम्पेन रंगांत घेऊ शकता. Intex Infie 33 ची किंमत पाहता हा Rs 5,049 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच Intex Infie 3 ग्रे, गोल्ड आणि लाइट ब्लू रंगांमध्ये फक्त Rs 4,649 मध्ये घेतला जाऊ शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo