इंटेक्स अॅक्वा 3G प्रो Q स्मार्टफोन लाँच, किंमत २,९९९ रुपये

HIGHLIGHTS

ह्यात 4 इंचाची WVGA 480x800 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 233ppi आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.

इंटेक्स अॅक्वा 3G प्रो Q स्मार्टफोन लाँच, किंमत २,९९९ रुपये

आपला क्लासिक स्मार्टफोन अॅक्वा क्लासिक लाँच केल्यानंतर, इंटेक्सने आपला नवीन स्मार्टफोन अॅक्वा 3G प्रो Q लाँच केला. ह्या स्मार्टफोनची किंमत २,९९९ रुपये आहे. हा कंपनीच्या साइटवर आपल्या किंमतीसह लिस्ट केला आहे. हा स्मार्टफोन लवकरच विक्रीसाठी उपलब्ध केला जाऊ शकतो.
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

इंटेक्स अॅक्वा 3G प्रो नवीन पिढीचा स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ३,६६६ रुपये आहे. अॅक्वा 3G प्रो Q स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची WVGA 480×800 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 233ppi आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.
 

ह्यात 1.2GHz क्वाड-कोर स्प्रेडट्रम SC7731C प्रोसेसर दिला गेला आहे. ह्यात 512MB ची रॅम दिली आहे. स्मार्टफोनमध्ये 4GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. त्याशिवाय ह्यात 2MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो फिक्स्ड फोकससह येतो. तसेच ह्यात 0.3 MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.

हेदेखील वाचा – उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…

ह्यात 1300mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी कंपनीनुसार, 5.5 तासांचा टॉकटाईम आणि जवळपास २०० तासांचा स्टँडबाय टाइम देते. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात GPRS/EDGE, 3G, A-GPS, ब्लूटुथ, वायफाय 802.11 b/g/n आणि मायक्रो-USB दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यातील एकच सिम 3G सपोर्ट करतो.

 

हेदेखील वाचा – LYF अर्थ 2 स्मार्टफोन लाँच, किंमत २०,९९९ रुपये

हेदेखील वाचा – मोटो Z, मोटो Z फोर्स स्मार्टफोन्स सप्टेंबरमध्ये होणार भारतात लाँच?

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo