८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला इनफोकस बिंगो 20 लाँच, किंमत ५,७४९ रुपये

८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला इनफोकस बिंगो 20 लाँच, किंमत ५,७४९ रुपये
HIGHLIGHTS

इनफोकसच्या ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये ४.५ इंचाची डिस्प्ले देण्यात आली असून ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत आहे ५,७४९ रुपये.

इनफोकसने आपला नवीन स्मार्टफोन बिंगो 20 लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ५,७४९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोनच्या अधिकृत वेबसाइटवर किंमतीसह लिस्ट केला गेला आहे. कंपनी लवकरच ह्याची घोषणा करणार आहे.

इनफोकस बिंगो 20 ड्यूल-सिम सपोर्ट करणारा फोन आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. स्मार्टफोनमध्ये 4.5 इंचाची FWVGA 480×854 पिक्सेलची IPS डिस्प्ले On-Cell टेक्नॉलॉजीसह दिली गेली आहे. ह्या फोनमध्ये 1.5GHz चे क्वाड-कोर स्प्रेडट्रम SC9830 प्रोसेसर दिले गेले आहे. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 1GB रॅमसुद्धा मिळत आहे.

फोनमध्ये आपल्याला 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चर आणि LED फ्लॅशसह मिळत आहे. तसेच ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे.

हेदेखील पाहा –  लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक Video

ह्या स्मार्टफोनमधील कनेक्टिव्हिटी पर्यायाविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE सपोर्टसह, वायफाय, ब्लूटुथ, FM रेडियो, GPS आणि मायक्रो-USB दिले गेले आहे. स्मार्टफोनमध्ये 2300mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

ह्याआधी कंपनीने आपला BINGO 21 सादर केला होता. कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ५,४९९ रुपये आहे. जर इनफोकस BINGO 21 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हयीत 4.5 इंचाची FWVGA डिस्प्ले दिली गेली आहे. हा स्मार्टफोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहेेेे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. रियर कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा दिला आहे. रियर कॅमेरा ऑटोफोकसने सुसज्ज आहे. तसेच ह्यात 2300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

हेदेखील पाहा –  Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू Video

हेदेखील वाचा – उत्कृष्ट लेन्ससह सुसज्ज असलेले हे आहेत सोनी सायबरशॉट कॅमेरे

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo