फक्त Rs 9,900 मध्ये मिळत आहे Redmi Note 5 Pro, जाणून घ्या इथे

फक्त Rs 9,900 मध्ये मिळत आहे Redmi Note 5 Pro, जाणून घ्या इथे
HIGHLIGHTS

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर चालू असलेल्या रिपब्लिक डे सेल मध्ये Redmi Note 5 Pro च्या किंमतीवर चांगलाच डिस्काउंट मिळत आहे आणि सोबतच बँक कार्ड ऑफर्स अंतर्गत 10% इंस्टंट डिस्काउंट पण मिळत आहे ज्यामुळे डिवाइसचा बेस वेरिएंट फक्त Rs 9,900 मध्ये विकत घेता येईल.

महत्वाचे मुद्दे

  • अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर मिळत आहेत ऑफर्स
  • HDFC आणि SBI कार्ड्स यूजर्स मिळवू शकतात 10% इंस्टंट डिस्काउंट
  • Redmi Note 5 Pro चा बेस वेरिएंट मिळत आहे Rs 9,900 मध्ये

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवीन सेलचे आयोजन केले आहे आणि सेल मध्ये अनेक स्मार्टफोन्स वर जबरदस्त डील्स मिळत आहेत. अनेक स्मार्टफोन्स अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर भरभक्कम डिस्काउंट सह विकले जात आहेत. दोन्ही कंपन्यांनी शाओमीच्या फोन्स वर खास डील्स सादर केल्या आहेत आणि या फोन्स मध्ये Redmi Y2, Redmi Note 5 Pro, Redmi Note 6 Pro, आणि Poco F1 इत्यादींचा समावेश आहे. तसेच Mi TV वर पण चांगला डिस्काउंट दिला जात आहे. Mi TV Pro 49-इंच मॉडेल सेल मध्ये Rs 29,999 मध्ये विकला जात आहे. अमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल 23 जानेवारीला संपेल तर फ्लिपकार्टचा सेल 22 जानेवारी पर्यंत चालेल. Redmi Note 5 Pro स्मार्टफोन 2018 चा बेस्ट-मिड रेंज स्मार्ट फोन होता जो सेल मधून Rs 9,900 (फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर मिळणाऱ्या 10% बँक डिस्काउंट सहित) मध्ये विकत घेता येईल. या किंमतीत Note 5 Pro विकत घटने बेस्ट ऑप्शन असेल.

अमेझॉन ग्रेट इंडियन सेल आणि फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल मध्ये Redmi Note 5 Pro चे 4GB आणि 6GB रॅम वेरिएंट डिस्काउंटेड किंमतीती विकले जात आहेत. Xaomi Redmi Note 5 Pro चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट Rs 10,999 मध्ये विकत घेता येईल, तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट Rs 12,999 मध्ये विकत घेता येईल. पण जर तुम्ही अमेझॉन इंडिया वर HDFC कार्ड द्वारा हा डिवाइस विकत घेतला किंवा फ्लिपकार्ट वर SBI कार्ड द्वारा हा विकत घेत असाल तर 10% चा इंस्टंट डिस्काउंट मिळवू शकता. हा डिस्काउंट मिळून डिवाइसचा बेस वेरिएंट Rs 9,900 मध्ये विकत घेता येईल आणि 6GB रॅम वेरिएंट Rs 11,700 मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Redmi Note 5 Pro स्पेसिफिकेशंस

Xiaomi Redmi Note 5 Pro बद्दल बोलायचे झाले तर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोन मध्ये 20MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्यासह LED लाइट पण देण्यात आली आहे. यात पोर्ट्रेट सेल्फी फीचर पण देण्यात आला आहे, जो बोकेह इफेक्ट देतो. सोबतच हा फोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह येत आहे. यात 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 5.99 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा डिवाइस 4000 mAh च्या बॅटरी सह येतो.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo