तुम्ही पॉवरफुल कॅमेरा असलेल्या OPPO स्मार्टफोनच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. फ्लिपकार्ट Oppo F17 Pro मोठ्या डिस्काउंटसह विकत आहे. OPPOचा हा स्मार्टफोन 9000 रुपयांपर्यंत स्वस्त विकत घेता येणार आहे. यात 128 GB स्टोरेजसह 6 कॅमेऱ्यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
OPPO F17 Pro ची किंमत आणि ऑफर:
OPPO चा हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेजसह एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. या स्मार्टफोनची किंमत 25,990 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवर हा फोन 34% सवलतीसह 16,990 रुपयांना विकला जात आहे. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि ब्लु या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अतिशय स्टायलिश, स्लिम आणि हलका असून, त्याची जाडी 7.48 मिमी आणि वजन 164 ग्रॅम आहे.
OPPO स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचचा फुल HD + सुपर एमोलेड डिस्प्ले आहे, डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2400×1080 पिक्सेल आहे. त्याबरोबरच, यात ड्युअल पंच होल डिझाइन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले असून, त्यात मागील बाजूस 4 आणि पुढील बाजूस 2 कॅमेरे देण्यात आले आहेत. मागील बाजूस, 48MP + 8MP + 2MP + 2MP चा क्वाड कॅमेरा सेटअप आहे. तसेच, सेल्फीसाठी 16MP + 2MP ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे. रियर कॅमेरासह तुम्हाला 4K व्हिडिओ रेकॉर्ड करता येतील.
या स्मार्ट-फोनमध्ये 4015mAh बॅटरी आहे, जी एकूण 10 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देते. तुमच्याकडे वेळ कमी असल्यास, 5 मिनिटांचा क्विक चार्ज शक्यतो 4 तासांपर्यंत चालेल.