Huawei P20 Pro स्मार्टफोन झाला अपडेट, जूनच्या सिक्यूरिटी पॅच सह स्मार्टफोनला मिळाला सुपर स्लो मोशन विडियो फीचर…

Huawei P20 Pro स्मार्टफोन झाला अपडेट, जूनच्या सिक्यूरिटी पॅच सह स्मार्टफोनला मिळाला सुपर स्लो मोशन विडियो फीचर…
HIGHLIGHTS

या नवीन अपडेट मध्ये स्वतःहून स्मार्टफोन ऑटोमेटिकली स्लो मोशन विडियो घेण्यास सक्षम होईल.

Huawei P20 Pro Smartphone gets Super Slow-Motion video feature: Huawei P20 Pro बाजारात सध्या सर्वात चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणू शकतो, पण एव्हढ्यावरच कंपनी ला समाधान वाटत नाही, कंपनी ने याला अजून चांगला करण्यासाठी एक सॉफ्टवेयर अपडेट जारी केला आहे. जो याला अजूनच खास बनवतो. विशेष म्हणजे या अपडेट मध्ये स्मार्टफोनला जूनचा सिक्यूरिटी पॅच मिळाला आहे, तसेच याच्या कॅमेरा मध्ये पण तुम्हाला खुप बदल मिळू शकतात. जसे आता पर्यंत सॅमसंग गॅलेक्सी S9 स्मार्टफोन मध्ये होते, त्याचप्रमाणे आता Huawei P20 Pro स्मार्टफोन पण सुपर स्लो मोशन विडियो घेण्यास सक्षम होईल, या डिवाइस चा कॅमेरा आता 960fps सह असे करण्यास सक्षम होईल. आता पर्यंत तुम्हाला एक शटर बटन प्रेस करावा लागत होता पण लवकरच हे सर्व बदलणार आहे. 

कंपनी ने आपल्या या स्मार्टफोन मध्ये हा फीचर आपल्या नवीन अपडेट सोबत जारी केला आहे, याचा अर्थ असा की कॅमेरा आता स्वतःहून मोशन डिटेक्ट करेल आणि स्वतःहून हे रेकॉर्ड पण करणार आहे. या सॉफ्टवेयर अपडेट चा बिल्ड नंबर B131 आहे, पण, खराब बाब ही आहे की हा OTA च्या रुपात जारी करण्यात आला नाही. याचा अर्थ असा की तुम्हाला मॅनुअली याला फ्लॅश करावे लागेल, यासाठी तुम्हाला Huawei Recovery Updater Tool ची गरज पडेल. पण असेही समोर येत आहे की कंपनी लवकरच हा अपडेट OTA च्या रुपात जारी करणार आहे. 

या नवीन अपडेट मध्ये बॅटरी लाइफ पण सुधारण्यासाठी काम करण्यात आले आहे, याव्यतिरिक्त या माध्यामातून सिस्टम ची परफॉर्मन्स वाढणार आहे. तसेच या अपडेट मध्ये काही बग फिक्स करण्यात आले आहेत. जे काही काळापासून स्मार्टफोन मध्ये दिसत होते. 

हा डिवाइस तुम्ही भारतात Rs 64,999 च्या किंमतीत Blue Color वेरिएंट मध्ये घेऊ शकता, हा विकत घेण्यासाठी तुम्हाला अमेजॉन इंडिया वर जावे लागले. याच्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर 
या स्मार्टफोन मध्ये 6.1 फुल HD+ OLED फुल व्यू डिस्प्ले आहे आणि डिवाइस च्या फ्रंट वर होम बटन आहे. हा होम बटन एजलेस फिंगरप्रिंट ला सपोर्ट करतो ज्यामुळे हा जेस्चर पण ओळखू शकतो जसे होम साठी लॉन्ग टॅप, बॅक साठी शॉर्ट टॅप आणि मल्टी टास्किंग साठी डावी आणि उजवी स्वाइप. 

Huawei P20 Pro मधील ट्रिपल कॅमेरा मध्ये 40 MP RGB 1/1.7-इंच सेंसर, 20 MP मोनोक्रोम सेंसर आणि 8MP टेलीफोटो लेंस आहे. डिवाइस च्या फ्रंट ला 24.8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे जो 3D पोर्ट्रेट लाइट इफेक्ट ला सपोर्ट करतो. हा डिवाइस 360 फेस अनलॉक फीचर सह येतो जो सेकंड्स मध्ये डिवाइस अनलॉक करू शकतो. तसेच डिवाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo