Huawei च्या या नव्या फोन मध्ये असेल 40 मेगापिक्सल चा कॅमेरा

Huawei च्या या नव्या फोन मध्ये असेल 40 मेगापिक्सल चा कॅमेरा
HIGHLIGHTS

रिपोर्ट नुसार Huawei P20 Pro कॅमेरा मध्ये स्लो मोशन फीचर पण दिला जाऊ शकतो. या फोन च्या कॅमेरा च्या मदतीने यूजर्स 720 P वर स्लो मोशन वीडियोज बनवू शकतील.

Huawei 27 मार्चला आपली Huawei P20 सीरीज सादर करू शकते ज्यात कंपनी चा P20 Pro स्मार्टफोन पण लॉन्च केला जाऊ शकतो. मागच्या काही रिपोर्ट्स नुसार या डिवाइस मध्ये तीन रियर कॅमेरा असतिल. 
या डिवाइस चा पहिला कॅमेरा 40 मेगापिक्सल च्या मोनोक्रोम सेंसर सह येईल आणि सोबतच डिवाइस मध्ये 8 मेगापिक्सल चा टेलिफोटो सेंसर आणि 20 मेगापिक्सल चा मोनोक्रोम सेंसर कॅमेरा पण असेल. 

याव्यतिरिक्त या डिवाइस मध्ये 6 GB रॅम असू शकतो आणि हा एंड्राइड 8.1 ओरियो वर चालतो. 
रिपोर्ट नुसार Huawei P20 Pro कॅमेरा मध्ये स्लो मोशन फीचर पण दिला जाऊ शकतो. या फोन च्या कॅमेरा च्या मदतीने यूजर्स 720 P वर स्लो मोशन वीडियोज बनवू शकतील.
फोनच्या समोरच्या बाजूस 24 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या डिवाइस मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले असेल ज्याचे रेज्ल्यूशन 1080*2240 पिक्सल असेल. Huawei P20 Pro सह 27 मार्चला कंपनी Huawei P20 आणि Huawei P20 Lite स्मार्टफोंस लॉन्च करू शकते. 

काही दिवसांपूर्वी Quandt च्या एका ट्वीट नुसार डिवाइसेज ची युरोपातील किंमत समोर आली आहे. Roland Quandt ने एका ट्वीट मध्ये सांगितले आहे की Huawei P20 मध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले असेल जो यूरोप मध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लॉन्च होईल आणि या डिवाइस ची किंमत €679 असेल. Huawei P20 Pro डिवाइस मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले असेल आणि या डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल तसेच यूरोप मध्ये या डिवाइस ची किंमत €899 असू शकते. 

यूरोप मध्ये या डिवाइसे चे फक्त दोन वेरिएन्ट्स लॉन्च केले जातील पण इतर भागात या डिवाइस चे अजुनही वेरिएंट येतील. जसे चीन मध्ये P20 डिवाइस चे अजून स्टोरेज वेरिएन्ट्स पण उपलब्ध होऊ शकतात. 
via

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo