Huawei Mate 20 Pro मोबाईल फोनला मिळाला हा खास अपडेट; जाणून घ्या काय होईल याने

Huawei Mate 20 Pro मोबाईल फोनला मिळाला हा खास अपडेट; जाणून घ्या काय होईल याने
HIGHLIGHTS

Huawei Mate 20 Pro मोबाईल फोनला मिळाला सुपर मॅक्रो मोड, हा अपडेट फोन मध्ये एक नवीन अपडेटच्या स्वरूपात देण्यात आला आहे.

जर Huawei Mate 20 Pro मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर हा मोबाईल फोन काही दिवसांपूर्वी ट्रिपल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला गेला होता. पण आत या मोबाईल फोनला लॉन्च नंतर थोड्याच दिवसांनी सुपर मॅक्रो मोड देण्यात आला आहे. तसेच या नवीन अपडेट मध्ये फोनला जानेवारी 2019 चा एंड्राइड सिक्यूरिटी पॅच पण देण्यात आला आहे. त्याचबरोबर नेविगेशनच्या जेस्चर आधारित सिस्टम मध्ये पण काही चांगले बदल झाले आहेत. याच महिन्याच्या सुरवातीला Huawei Mate 20 Pro मोबाईल फोनला डिसेंबर महिन्याचा सिक्यूरिटी पॅच मिळाला होता. तसेच या अपडेट मध्ये मास्टर AI मोड आणि फेस अनलॉकच्या परफॉरमेंस मध्ये पण खूप सुधार समोर आले आहेत. 

या नवीन अपडेटचा बिल्ड नंबर C636E10R3P2 आहे. तसेच याची साइज जवळपास 346MB ची आहे. जर तुमच्याकडे पण Huawei चा हा स्मार्टफोन आहे आणि तुम्हाला आतापर्यंत हा अपडेट मिळाला नसेल तर तुम्ही हा सेटिंग मध्ये जाऊन मॅन्युअली चेक करू शकता.

Huawei Mate 20 Pro मध्ये 6.39 इंच QHD+ फ्लेक्सिबल OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात हुवावेचा 7 nm प्रोसेसचा Kirin 980 SoC देण्यात आला आहे. यात 6 GB RAM आणि 128 GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा डिवाइस कोणत्याही प्रकारचा microSD कार्ड एक्सेप्ट करत नाही. त्याजागी हा हुवावेचा NM कार्ड एक्सेप्ट करतो जो 256 GB पर्यंतच्या स्टोरेज ऑप्शन सह उपलब्ध आहे. कॅमेरा सेट-आप बद्दल बोलायचे तर Huawei Mate 20 Pro मध्ये 40 MP (वाइड एंगल लेंस, f/1.8 अपर्चर)+20 MP (अल्ट्रा-वाइड एंगल लेंस, f/2.2  अपर्चर)+ 8 MP ( f/2.4 अपर्चर सह टेलीफोटो लेंस) देण्यात आली आहे.

कॅमेरा लेंस स्पेशलिस्ट Leica सोबत कोलॅब्रेशन करून या डिवाइसची कॅमेरा सिस्टम बनवण्यात आली आहे जी वाइड 16-270 mm फोकल रेंज उपलब्ध करून देते आणि Aser Autofocus, Phase Detection Autofocus आणि Contrast Detection Autofocus सह येते. विशेष म्हणजे या स्मार्टफोनची कॅमेरा सिस्टम AIS ला सपोर्ट लार्ते जी Huawei ची AI आधारित image stabilisation system आहे.

या मोबाईल फोनचा फ्रंट फेसिंग कॅमेरा 24 MP चा आहे जो 3D डेप्थ सेंसिंग करतो. या फोनचे कनेक्टिविटी ऑप्शन पाहता हुवावे च्या Mate 20 Pro मध्ये ड्यूल सिम स्लॉट्स देण्यात आले आहेत जे 4G VoLTE, GPS (L1+L5 ड्यूल बँड), Wi-Fi (802.11 a/b/g/n/ac), Bluetooth (v 5.0), NFC ला सपोर्ट करतात. या मोबाईल फोन मध्ये युजर्सना इन्स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर पण मिळेल. यात 4,200 mAh क्षमता असलेली दमदार बॅटरी देण्यात आली जी हुवावेच्या SuperCharging सिस्टम सह येते.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo