Amazon Prime मेंबर्स साठी अमेझॉन वर उपलब्ध Huawei Mate 20 Pro

Amazon Prime मेंबर्स साठी अमेझॉन वर उपलब्ध Huawei Mate 20 Pro
HIGHLIGHTS

गेल्याच आठवड्यात लॉन्च झालेला हुवावेचा लेटेस्ट स्मार्टफोन Mate 20 Pro सेल साठी उपलब्ध करवण्यात आला आहे. अमेझॉन प्राइम मेंबर्स हा स्मार्टफोन 4 डिसेंबरला विकत घेऊ शकतात.

Huawei Mate 20 Pro आता Amazon Prime मेंबर्स साठी एक्सक्लूसिवली उपलब्ध आहे. युजर्स अमेझॉन वर होत असलेल्या या सेलचा फायदा 4 डिसेंबर पर्यंत घेऊ शकतात. विशेष म्हणजे भारतात हा स्मार्टफोन गेल्याच आठवड्यात लॉन्च करण्यात आला होता. या फोनची खासियत म्हणजे हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो Kirin 980 प्रोसेसर वर चालतो. हा स्मार्टफोन दोन कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात Emerald Green आणि Twilight Blue रंगांचा समावेश आहे. या स्मार्टफोनची भारतीय मार्केट मध्ये किंमत 69,990 रुपये आहे. लवकरच हा स्मार्टफोनविकत घेतल्यास युजर्सना Sennheiser PXC 550 वायरलेस हेडफोन्स 71,990 रुपयांमध्ये दिले जात आहेत.

Huawei Mate 20 Pro सोबत मिळणाऱ्या लॉन्च ऑफर्स

स्मार्टफोनच्या लॉन्च ऑफर्स अंतर्गत युजर्सना 12 महिन्यासाठी 499 रुपये किंवा त्यावरील Red/ Nirvana Vodafone Idea पोस्टपेड रेंटल प्लान्स वर 20% चा बिल रेंटल डिस्काउंट दिला जात आहे. त्याचबरोबर 199 रुपयांच्या रिचार्ज वर Vodafone Idea 9 सब्सक्राइबर्सना रोज 1.1GB डाटा दिला जात आहे.

Huawei Mate 20 Pro आला आहे या खास स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सह

Huawei Mate 20 Pro मध्ये 6.39 इंच QHD+ फ्लेक्सिबल OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात हुवावेचा 7 nm प्रोसेसचा Kirin 980 SoC देण्यात आला आहे. यात 6 GB RAM आणि 128 GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा डिवाइस कोणत्याही प्रकारचा microSD कार्ड एक्सेप्ट करत नाही. त्याजागी हा हुवावेचा NM कार्ड एक्सेप्ट करतो जो 256 GB पर्यंतच्या स्टोरेज ऑप्शन सह उपलब्ध आहे. कॅमेरा सेट-आप बद्दल बोलायचे तर Huawei Mate 20 Pro मध्ये 40 MP (वाइड एंगल लेंस, f/1.8 अपर्चर)+20 MP (अल्ट्रा-वाइड एंगल लेंस, f/2.2  अपर्चर)+ 8 MP ( f/2.4 अपर्चर सह टेलीफोटो लेंस) देण्यात आली आहे.

कॅमेरा लेंस स्पेशलिस्ट Leica सोबत कोलॅब्रेशन करून या डिवाइसची कॅमेरा सिस्टम बनवण्यात आली आहे जी वाइड 16-270 mm फोकल रेंज उपलब्ध करून देते आणि Aser Autofocus, Phase Detection Autofocus आणि Contrast Detection Autofocus सह येते. विशेष म्हणजे या स्मार्टफोनची कॅमेरा सिस्टम AIS ला सपोर्ट लार्ते जी Huawei ची AI आधारित image stabilisation system आहे.

या मोबाईल फोनचा फ्रंट फेसिंग कॅमेरा 24 MP चा आहे जो 3D डेप्थ सेंसिंग करतो. या फोनचे कनेक्टिविटी ऑप्शन पाहता हुवावे च्या Mate 20 Pro मध्ये ड्यूल सिम स्लॉट्स देण्यात आले आहेत जे 4G VoLTE, GPS (L1+L5 ड्यूल बँड), Wi-Fi (802.11 a/b/g/n/ac), Bluetooth (v 5.0), NFC ला सपोर्ट करतात. या मोबाईल फोन मध्ये युजर्सना इन्स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर पण मिळेल. यात 4,200 mAh क्षमता असलेली दमदार बॅटरी देण्यात आली जी हुवावेच्या SuperCharging सिस्टम सह येते.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo