HTC ने आपला नवीन स्मार्टफोन HTC वन M9+ प्राईम कॅमेरा एडिशन लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक हेलिओ X10 प्रोसेसर आणि 5.2 इंचाची डिस्प्ले मिळत आहे.
HTC ने आपला आकर्षक कॅमेरा स्मार्टफोन वन M9 प्राइम कॅमेरा एडिशन लाँच केल्यानंतर काही दिवसांतच ह्याचा नवीन एडिशन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन HTC वन M9+ प्राईम कॅमेरा एडिशन आहे. ह्या स्मार्टफोनला आपण HTC इंडियाच्या ई-स्टोरवर पाहू शकता.
Survey
✅ Thank you for completing the survey!
ह्या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक हेलिओ X10 प्रोसेसर आणि 5.2 इंचाची FHD डिस्प्ले दिली आहे. त्याचबरोबर ह्यात 2GB ची रॅम आणि 16GBचे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनमध्ये 2840mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
ह्या स्मार्टफोनची किंमत २३,९९० रुपये आहे. मात्र अजून हा अधिकृतरित्या विक्रीसाठी उपलब्ध झालेला नाही. हा एक थर्ड पार्टी रिटेलरच्या माध्यमातून खरेदी केला जाऊ शकतो.