डिस्प्ले होल सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor V20

डिस्प्ले होल सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor V20
HIGHLIGHTS

Honor V20 चीन मध्ये अधिकृतरीत्या लॉन्च केला गेला आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी Honor ने स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच त्याची उपलब्धता आणि त्याच्या किंमतीचा पण खुलासा केला आहे.

महत्वाचे मुद्दे:

  • Kirin 980 SoC प्रोसेसर सह येत आहे हा स्मार्टफोन
  • चीन मध्ये CNY 2,999 च्या बेस किंमतीत झाला लॉन्च
  • तीन कलर वेरिएंट्स सह उपलब्ध

 

दीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी स्मार्टफोन निर्माता कंपनी ने Honor V20 पंच होल सेल्फी कॅमेरा डिजाइनसह चीन मध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या डिजाइनबद्दल बोलायचे तर हा डिवाइस Huawei Nova 4 सारखाच आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्यूल कॅमेरा सेट-अप देण्यात आला आहे.

Honor V20 ची खासियत पाहता यात 48 मेगापिक्सल Sony IMX586 रिअर सेन्सर, HiSilicon Kirin 980 SoC, एक 25 मेगापिक्सलचा सेल्फी स्नॅपर, 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच यात लिंक टर्बो टेक्नॉलॉजी पण वापरण्यात आली आहे. तसेच हा फोन चार्म ब्लू, रेड आणि मिडनाईट ब्लॅक रंगांत उपलब्ध होईल. Honor ने या फोनचा Moschcino Edition पण लॉन्च केला आहे.

Honor Moschcino Edition चा पहिला सेल 28 डिसेंबरला ठेवण्यात येईल ज्यात रेड आणि ब्लू कलर ऑप्शंस उपलब्ध आहेत. Tmall, Vmall, Jingdong, Sunning.com वर याची प्रीबुकिंग सुरु झाली आहे.

Honor V20 ची किंमत

Honor V20 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर याची किंमत 2,999 चीनी युआन म्हणजे जवळपास 30,400 रुपयांपासून सुरु होते ज्यात युजर्सना 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज वेरिएंट मिळत आहे. तसेच या फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट चीनी मार्केट मध्ये 3,499 चीनी युआन म्हणजे जवळपास 35,500 रुपयांमध्ये विकला जाईल. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज सह येणाऱ्या या फोनची किंमत 3,999 चीनी युआन म्हणजे जवळपास 40,600 रुपये आहे. Honor V20 चा ग्लोबल वेरिएंट Honor View 20 कंपनी पॅरिस मध्ये 22 जानेवारीला लॉन्च करेल.

Honor V20 ची उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्स

Honor V20 पंच होल सेल्फी कॅमेरा डिजाइन सह येतो. फोन मध्ये सेल्फी सेंसर स्मार्टफोनच्या वरच्या बाजूला डावीकडे ठेवण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ड्यूल रियर कॅमेरा सेट-अप आहे. बॅकपॅनल ग्लॉसी ग्रेडिएंट फिनिश सह येतो. Honor V20 आउट ऑफ बॉक्स एंड्रॉयड 9.0 पाई वर आधारित MagicUI 2.0.1 वर चालेल. यात 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह फुल HD+ (1080×2310 पिक्सेल) TFT LCD डिस्प्ले आहे. त्याचबरोबर यात कंपनीच्या लेटेस्ट 7nm ऑक्टकोर HiSilicon Kirin 980 SoC प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. रॅम मध्ये युजर्सना 6 जीबी आणि 8 जीबी सह इनबिल्ट स्टोरेज, 128 जीबी आणि 256 जीबी दिली जात आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड साठी कोणताही सपोर्ट नाही.

कॅमेरा सेट-अप बद्दल बोलायचे तर Honor V20 मध्ये 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर आहे. हा प्राइमरी सेंसर एफ/1.8 अपर्चर, 960 फ्रेम प्रति सेकेंड स्लो मोशन वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट, ऑटोफोकस, AI HDR आणि LED फ्लॅश सह येतो. सोबत 3D Time of Flight (ToF) सेंसर पण देण्यात आला ज्यामुळे डेप्थ कॅपचर करता येते. फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 25 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फिक्स्ड फोकस सेंसर आहे. एआई फोटो, नाइट सीन, पोर्ट्रेट, फन एआर, टाइम-लॅप्स फोटोग्राफी आणि स्लो-मोशन सारखे कॅमेरा फीचर या फोनचा भाग आहेत.

4,000 एमएएच च्या बॅटरी सह Honor V20 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. लिंक टर्बो टेक्नोलॉजीच्या मदतीने फोन आपोआप डेटा आणि वाई-फाई मध्ये स्विच करू शकतो. ब्लूटूथ 5.0, वाई-फाई 802.11 ए/बी/जी/एन/एसी, जीपीएस/ ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी सारखे कनेक्टिविटी फीचर फोन मध्ये आहेत. या फोन मध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, डिजिटल कंपास, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसर पण देण्यात आले आहेत.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo