Honor 9 Lite स्मार्टफोन आता आठवड्यातून दोनदा सेल साठी केला जाणार आहे उपलब्ध

HIGHLIGHTS

कदाचित तुम्हाला माहित असेल की 8 एप्रिल पर्यंत तसाही Honor 9 Lite स्मार्टफोन चा 4GB वर्जन ओपन सेल साठी उपलब्ध आहे.

Honor 9 Lite स्मार्टफोन आता आठवड्यातून दोनदा सेल साठी केला जाणार आहे उपलब्ध

Honor ने आता अशी घोषणा केली आहे की Honor 9 Lite स्मार्टफोन आता आठवड्यातून दोनदा सेल साठी उपलब्ध केला जाईल. याचा अर्थ असा की हा स्मार्टफोन आता आठवड्यातून दोनदा म्हणजे दर मंगळवारी आणि गुरुवारी सेल साठी उपलब्ध केला जाईल. 
हा स्मार्टफोन आठवड्यातून दोन्ही दिवशी फ्लिप्कार्ट च्या माध्यमातून अगदी सहज विकत घेतला जाऊ शकतो. हे लक्षात असू दे की हा सेल Honor 9 Lite स्मार्टफोन च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वर्जन साठी केला जाणार आहे. याव्यतिरिक्त जर याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वर्जन बद्दल बोलायचे झाले तर याला ओपन सेल मध्ये 8 एप्रिल पर्यन्त तसेही उपलब्ध केले जात आहे. 
तसेच Honor 9 Lite स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर याचा 4GB रॅम वर्जन तुम्हाला Rs. 2,000 च्या अतिरिक्त बंप-अप एक्सचेंज ऑफर सह उपलब्ध केला जात आहे. हा Honor World Carnival अंतर्गत सेल केला जात आहे, या कार्निवाल ची सुरुवात 4 एप्रिल पासून झाली होती. 
याव्यतिरिक्त हॉनर च्या स्पेशल सेल मध्ये Honor 9 Lite स्मार्टफोन च्या 3GB रॅम वेरिएंट आज फ्लॅश सेल साठी उपलब्ध केला जाणार आहे. 
जर Honor 9 Lite स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर Honor 9 Lite स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.65-इंचाचा FHD+ 2160×1080 पिक्सेल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले मिळत आहे. हा स्क्रीन 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह येतो. 
स्मार्टफोन मध्ये ओक्टा-कोर किरिन 650 CPU देण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला एक 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन सह एक 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज वाला वेरिएंट पण मिळत आहे. 
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Content Writer - Marathi View Full Profile