हुआवे ऑनर 5X आणि होली 2 प्लस स्मार्टफोन लाँच

हुआवे ऑनर 5X आणि होली 2 प्लस स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

भारतीय बाजारात ऑनर 5X ची किंमत १२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे, तर ऑनर हॉली 2 प्लस ८,४९९ रुपयात मिळेल. दोन्ही स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होतील.

मोबाईल निर्माता कंपनी हुआवे भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स ऑनर 5X आणि होली 2 प्लस लाँच केले आहेत. कंपनीने भारतीय बाजारात ऑनर 5X ची किंमत १२,९९९ रुपये ठेवली आहे, तर ऑनर हॉली 2 प्लस ८,४९९ रुपयात मिळेल. दोन्ही स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होतील. ऑनर 5X ची प्री-ऑर्डर बुकिंग गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून सुरु झाली आहे आणि ह्याची विक्री १ फेब्रुवारीपासून सुरु होईल.  तर ऑनर हॉली 2 प्लस १५ फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

 

हुआवे ऑनर 5X च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 64 बिट ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१६ प्रोसेसर, एड्रेनो 405 GPU आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

 

ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल LED फ्लॅशसह १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिली आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो आणि त्याच्यावर ईएमयूआय 3.1 स्किन चा वापर केला गेला आहे. ऑनर 5X एक ड्यूल सिम डिवाइस आहे. जो ड्यूल 4G स्टँडबाय सपोर्ट सह येईल. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा एक क्विक चार्जिंगला सपोर्ट करतो. ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले आहे, जे कंपनीच्या लेटेस्ट ’फिंगरप्रिंट 2.0’ टेक्नॉलॉजीच्या मदतीने डेव्हलप केले गेले आहे.

कनेक्टव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटुथ 4.1, USB 2.0, GPS A-GPS, वायफाय 802.11 B/G/N आणि 4G LTE सपोर्ट आहे. ऑनर 5X चे परिमाण 151.3×76.3×8.15mm आहे आणि ह्याचे वजन 158 ग्रॅम आहे.

तर हुआवे ऑनर होली 2 प्लस स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz 64- बिट क्वाड-कोर मिडियाटेक MT6735P प्रोसेसर, माली 720 GPU आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो आणि ह्यावर ईएमयूआय 3.1 स्किनचा वापर केला गेला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.

 

कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, ब्लूटुथ, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB फीचर्स समाविष्ट आहेत. हा स्मार्टफोन 4000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन टेक्स्चर्ड रियर पॅनलसह येईल.

हा स्लाइडशो पाहा – २०१६ मधील ह्या स्मार्टफोन्समध्ये असू शकतो उत्कृष्ट प्रोसेसर

हेदेखील पाहा- अखेर भारतात लाँच झाला ब्लॅकबेरीचा पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रीव

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo