HONOR 20I PHANTOM RED LIMITED EDITION भारतात झाला सादर

HONOR 20I PHANTOM RED LIMITED EDITION भारतात झाला सादर

काही दिवसांपूर्वी हॉनरच्या Honor 20i स्मार्टफोनच्या एका नवीन वेरीएंटची घोषणा केली गेली आहे. Honor 20i मध्ये आता यूजर्सना एक नवीन कलर वेरीएंट मिळेल. कंपनीने स्मार्टफोनच्या नवीन वेरीएंट Honor 20i Phantom Red Limited Edition ची घोषणा केली आहे. भारतात झालेल्या या घोषणेनंतर यूजर्स हा फोन Midnight Black आणि Phantom Blue व्यतिरिक्त Phantom Red Limited Edition मध्ये पण विकत घेऊ शकतात. 

हा फोन यूजर्स Honor च्या online store आणि Flipkart मधून विकत घेऊ शकतात. Honor 20i डिवाइस Rs 14,999 मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि हा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येतो. Honor 20i मध्ये 6.21 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340×1080 पिक्सलचे FHD+ रेजोल्यूशन ऑफर करतो आणि डिस्प्लेच्या वर एक टियर ड्रॉप नॉच आहे. Honor 20i फँटम ब्लू, फँटम रेड आणि मिडनाईट ब्लॅक कलर्स मध्ये विकत घेता येईल. 

Honor 20i स्मार्टफोन 2.2GHz किरिन 710 चिपसेट द्वारा संचालित आहे जो 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह पेयर देण्यात आला आहे. डिवाइसची स्टोरेज को माइक्रो एसडी कार्ड द्वारे 512GB पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन पण मॅजिक UI सह एंड्राइड पाई वर चालतो. AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मध्ये एक 24MP चा प्राइमरी कॅमेरा मिळत आहे ज्याचा अपर्चर f/1.8 आहे, दुसरा वाइड-एंगल कॅमेरा 8MP ची लेंस आहे आणि तिसरा 2MP चा डेप्थ सेंसर आहे. 

डिवाइसचा मुख्य कॅमेरा AIS सुपर नाईट शॉट्स कॅप्चर करू शकतो. Honor 20i मध्ये 32MP चा AI सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे आणि फोन मध्ये 3,400mAh ची बॅटरी आहे. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo