Google Pixel 3, Google Pixel 3 XL मोबाईल फोन एयरटेल ऑनलाइन स्टोर आणि फ्लिप्कार्ट वर प्री-ऑर्डर साठी झाले उपलब्ध

Google Pixel 3, Google Pixel 3 XL मोबाईल फोन एयरटेल ऑनलाइन स्टोर आणि फ्लिप्कार्ट वर प्री-ऑर्डर साठी झाले उपलब्ध
HIGHLIGHTS

Google Pixel 3 मोबाईल फोनच्या 64GB आणि 128GB मॉडेलची किंमत क्रमश: Rs 71,000 आणि Rs 80,000 आहे. तसेच Google Pixel 3 XL मोबाईल फोनच्या 64GB आणि Rs 128GB मॉडेल्सची किंमत क्रमश: Rs 83,000 आणि Rs 92,000 आहे.

आता काही आठवड्यांपूर्वीच Google ने त्यांच्या नवीन जेनरेशन मध्ये लेटेस्ट मोबाईल फोन्स म्हणजे Pixel 3 आणि Pixel 3 XL लॉन्च केले होते. आता हे दोन्ही मोबाईल फोन भारतात प्री-ऑर्डर साठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तुम्ही एयरटेल ऑनलाइन स्टोर आणि फ्लिप्कार्ट वर जाऊन या फोन्स साठी प्री-ऑर्डर देऊ शकता. Google Pixel 3 मोबाईल फोनच्या 64GB आणि 128GB मॉडेलची किंमत क्रमश: Rs 71,000 आणि Rs 80,000 आहे. तसेच Google Pixel 3 XL मोबाईल फोनच्या 64GB आणि Rs 128GB मॉडेल्सची किंमत क्रमश: Rs 83,000 आणि Rs 92,000 आहे. तुम्ही हे दोन्ही मोबाईल फोन्स ब्लॅक, क्लियरली वाइट आणि नॉट पिंक कलर मध्ये विकत घेऊ शकता. या डिवाइसची शिपिंग 3 नोव्हेंबरला सुरू होईल. 

Pixel 3 आणि Pixel 3 XL वर मिळणार्‍या ऑफर्स
जर आपण फ्लिप्कार्ट वर मिळणार्‍या ऑफर्स पहिल्या तर तिथे तुम्हाला नो-कॉस्ट EMI ऑप्शन या दोन्ही फोन्स सोबत मिळत आहे. तसेच जर तुम्ही पहिल्यांदाच इंटरनेट वर ऑनलाइन पे करत असाल तर तुम्हाला तुमच्या मास्टरकार्ड वर 10 टक्क्यांचा इंस्टेंट डिस्काउंट पण मिळेल. पण जर तुम्ही भी Axis Bank Buzz क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केली तर तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. या दोन्ही फोन्स सोबत तुम्हाला इतर काही ऑफर्स पण मिळत आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला Pixel 3 मोबाईल फोन वर जवळपास Rs 14,200 ची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. तसेच काही निवडक मॉडेल्स वर तुम्हाला जवळपास Rs 7,000 ची एक्स्ट्रा एक्सचेंज ऑफर मिळत आहे. किंवा मग जर तुम्ही HDFC बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून हे फोन्स विकत घेतले तर तुम्हाला यांच्यावर जवळपास Rs 4000 चा इंस्टेंट डिस्काउंट पण मिळू शकतो. एयरटेल स्टोर वर पण तुम्हाला चांगल्या चांगल्या ऑफर मिळत आहेत, ज्या तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. 

Pixel 3 आणि Pixel 3 X स्पेसिफिकेशन्स 
स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे तर पिक्सल 3 मध्ये 5.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि पिक्सल 3 XL मध्ये 6.3 इंचाचा क्वॉड HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक नॉच डिस्प्ले आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 18.5:9 आहे. दोन्ही फोन्स स्नॅपड्रॅगन 845 SoC, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज सह सादर करण्यात आले आहेत. 

Pixel 3 आणि Pixel 3 XL मध्ये 12 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात चांगल्या यूजर एक्सपीरियंस साठी नाईट साइट, प्ले ग्राउंड आणि सुपर रेस झूम सारखे फीचर्स आहेत. डिवाइसच्या फ्रंटला दोन कॅमेरा मोड्यूल देण्यात आले आहेत, ज्यातील एक नार्मल लेंस आहे आणि दुसरी वाइड-एंगल लेंस आहे. डिवाइसच्या फ्रंटला दोन 8 मेगापिक्सलचे सेंसर्स आहेत. दोन्ही फोन्स एंड्राइड 9 पाई वर चालतात आणि डिजिटल वेलबिंग आणि कॉल स्क्रीन सारख्या फीचर्स सह येतात. पिक्सल 3 आणि पिक्सल 3 XL मध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP68 वॉटर अँड डस्ट रेजिस्टेंस देण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo