फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज असलेला जिओनी W909 फ्लिप फोन लाँच

HIGHLIGHTS

चीनमध्ये जिओनीने आपला नवीन स्मार्टफोन W909 क्लेमशेल लाँच केला आहे. ह्यात दोन ४.२ इंचाची HD 720x1280 पिक्सेल रिझोल्युशन असलेली IPS डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात आउटर डिस्प्लेवर 2.5D ची ग्लास दिली गेली आहे.

फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज असलेला जिओनी W909 फ्लिप फोन लाँच

जिओनीने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन W909 क्लेमशेल लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत सर्वसाधारण CNY 3,999 (जवळपास ४१,००० रुपये) आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्धही झाला आहे. मात्र चीनबाहेरील देशात हा कधी लाँच केला जाईल ह्याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

हा स्मार्टफोन बाजारातील पहिला असा स्मार्टफोन आहे, जो फ्लिप असूनसुद्धा फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात USB टाइप C पोर्ट आणि ड्यूल टचस्क्रीन देण्यात आली आहे. त्याशिवाय हा स्मार्टफोन मेटल बॉडीने बनला आहे.

अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालणारा हा स्मार्टफोन ड्यूल-सिमला सपोर्ट करतो. ह्यात दोन ४.२ इंचाची HD 720×1280 पिक्सेल रिझोल्युशन असलेली IPS डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात आउटर डिस्प्लेवर 2.5D ची ग्लास दिली गेली आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6755M प्रोसेसर आणि 4GB ची रॅम दिली गेली आहे.

हेदेखील पाहा – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू Video

त्याशिवाय ह्या फोनमध्ये 64GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्यात 52GB यूजरला वापरण्यासाठी साठी आहे. आपण ह्याची स्टोरेज मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा PDAF आणि LED फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याशिवाय ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्यात 2530mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे.

हेदेखील वाचा – गुगलचे सीईओ सुंदर पिचाई ह्यांना २०१५ मध्ये मिळाला ६६७ करोड पगार

हेदेखील वाचा – शाओमी लाँच केला 3GB रॅम असलेला रेडमी 3 प्रो

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo