जिओनीच्या ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये आहे 5020mAh क्षमतेची बॅटरी

HIGHLIGHTS

ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन एक्सक्लुसिवली फ्लिपकार्टवर २६,९९९ रुपयात उपलब्ध होईल. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

जिओनीच्या ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये आहे 5020mAh क्षमतेची बॅटरी

फ्लिपकार्टवर खऱेदी करा जिओनी मॅरेथॉन M5 प्लस २६,९९९ रुपयात

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

जिओनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन मॅरेथॉन M5 प्लस लाँच केला आहे. ह्या डिवाइसची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात 5020mAh ची छोटी बॅटरी दिली गेली आहे. ह्याची किंमत २६,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन एक्सक्लुसिवली फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. ह्या स्मार्टफोन सीरिजची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याची बॅटरी लाइफ. कंपनीचा दावा आहे की, ह्याची 5020mAh बॅटरी 21 तासांची बॅटरी बॅकअप देते.

ह्यात ६ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. हा AMOLED डिस्प्ले आहे आणि ह्याची पिक्सेल तीव्रता 368ppi आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. त्याचबरोबर ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. मॅरेथॉन M5 प्लस अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारिक जिओनीच्या अमिगो 3.1 ओएसवर चालेल.
 

जिओनीच्या MD आणि CEO अरविंद आर वोहराने सांगितले होते की, “आम्ही भारतात M5 प्लसला लाँच करुन खूपच आनंदी आहोत. आमचा उद्देश आहे की, यूजर्सला बॅटरीमुळे येणा-या अडचणींपासून बचाव करणे आहे. आम्ही आमच्या यूजर्सला लक्षात ठेवून आमच्या डिवाइसचे डिझाईन आणि फीचर्स बनवत आहोत.”
 

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये जिओनीने मॅरेथॉन M5 ला लाँच केले होते. ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्यात 6020mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्याची मोठी बॅटरी 65 तासांचा टॉकटाईम देते. ह्याचे स्पेक्स M5 प्लससारखेच आहेत.

हेदेखील वाचा- हा आहे जगातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत केवळ ९९ रुपये
हेदेखील वाचा – झोलो ब्लॅक 1X च्या किंमतीत झाली घट, ही आहे ह्याची नवीन किंमत

 

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo