25 ऑगस्टला Asus Zenfone Max Pro M1 वर मिळेल 500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट

HIGHLIGHTS

पण, Zenfone Max Pro M1 च्या 6GB रॅम वेरिएंट वर असुस कोणताही डिस्काउंट देत नाही.

25 ऑगस्टला Asus Zenfone Max Pro M1 वर मिळेल 500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट

फ्लिपकार्ट ने आपल्या पुढील नवीन सेल "फ्लिपकार्ट सुपर सेल ची घोषणा केली आहे, या सेल चे आयोजन 25 ऑगस्ट ला करण्यात आले आहे. त्या दरम्यान असुस ने आपल्या दोन प्रसिद्ध स्मार्टफोंस Asus Zenfone Max Pro M1 आणि Asus Zenfone 5Z वर डील्स ची घोषणा केली आहे. Zenfone Max Pro M1 सेल मध्ये खुप कमी किंमतीत सादर केला जाईल. या स्मार्टफोन च्या 3GB आणि 4GB दोन्ही वेरिएंट्स वर 500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. पण, डिवाइस च्या 6GB रॅम वेरिएंट वर असुस कोणताही डिस्काउंट देत नाही. डिस्काउंट व्यतिरिक्त, यूजर्सना HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड ने EMI ट्रांजेक्शन वर इंस्टंट 10% डिस्काउंट पण मिळत आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

ऑफर्स
या महिन्यात फ्लिपकार्ट चा हा दुसरा सेल आहे. फ्लिपकार्ट च्या सुपर सेल मध्ये अजूनही अनेक स्मार्टफोन्स चांगल्या डिस्काउंट सह उपलब्ध होतील. 25 ऑगस्ट ला Max Pro M1 चे 3GB आणि 4GB रॅम वेरिएंट 500 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येतील. त्याचबरोबर यूजर्स जून स्मार्टफोन एक्सचेंज करून 10,000 रूपये वाचवू शकतात.  

Asus Zenfone 5Z वर मिळत आहेत या ऑफर्स
कंपनीच्या फ्लॅगशिप डिवाइस Asus Zenfone 5Z बद्दल बोलायचे तर या स्मार्टफोन वर पण कंपनी 3,000 रुपयांची सूट देत आहे. Zenfone 5Z च्या 6GB+64GB वेरिएंट ची किंमत 29,999 रूपये आहे, तर 6GB+128GB वेरिएंट ची किंमत 32,999 तसेच 8GB+256GB वेरिएंट ची किंमत 36,999 रूपये आहे. 

फ्लिपकार्ट सुपर सेल
फ्लिपकार्ट चा सुपर सेल 25 ऑगस्ट पासून सर्व यूजर्स साठी सुरू होईल तर फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स 24 ऑगस्ट 2018 च्या रात्री 9 वाजल्यापासून सेल मध्ये सहभागी होऊ शकतात. फ्लिपकार्ट अनेक लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स आणि कॅमेरा तसेच इतर इलेक्ट्रॉनिक आइटम्स वर पण डील्स देत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo