आता ‘पिंक गोल्ड’ रंगातही मिळणार गॅलेक्सी S7, S7 एज स्मार्टफोन

HIGHLIGHTS

हे दोन्ही स्मार्टफोन्स गुलाबी सोनेरी रंंगाशिवाय ब्लॅक ओनिक्स, गोल्ड प्लॅटिनम, व्हाइट पर्ल आणि सिल्वर टायटेनियम रंगात आधीपासूनच उपलब्ध आहे. आता हे दोन्ही फोन्स ५ रंंगात उपलब्ध होतील.

आता ‘पिंक गोल्ड’ रंगातही मिळणार गॅलेक्सी S7, S7 एज स्मार्टफोन

अलीकडेच सोनीने आपला एक स्मार्टफोन गुलाबी व्हर्जनमध्ये लाँच केला होता, त्याच्यापाठोपाठ आता सॅमसंगही ह्या यादीत सामील झाला आहे. त्यांनी आपले गॅलेक्सी S7, S7 एज पिंक गोल्ड रंगात उपलब्ध केला आहे. अॅप्पलच्या ‘रोझ गोल्ड’ रंगाला आता इतर सर्व कंपन्यांनी टक्कर देण्याचे बहुधा पक्के केले आहे असेच ह्यावरुन दिसत आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

खरे पाहता सॅमसंगने बाजारात आपला गॅलेक्सी S7 आणि गॅलेेक्सी S7 एज ला पिंक गोल्ड रंगात लाँच केले आहे. सध्यातरी हा केवळ साउथ कोरियामध्ये लाँच केला गेला आहे, मात्र कंपनीचे म्हणणे आहे की, लवकरच हा इतर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.

हे दोन्ही स्मार्टफोन्स गुलाबी सोनेरी रंंगाशिवाय ब्लॅक ओनिक्स, गोल्ड प्लॅटिनम, व्हाइट पर्ल आणि सिल्वर टायटेनियम रंगात आधीपासूनच उपलब्ध आहे. आता हे दोन्ही फोन्स ५ रंंगात उपलब्ध होतील.

हेदेखील वाचा – उत्कृष्ट बॅटरी लाइफने सुसज्ज आहेत सॅमसंगचे हे दोन आकर्षक स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – 
अॅप्पलने लाँच केला नवीन मॅकबुक, नवीन प्रोसेसरने सुसज्ज

Content Writer - Marathi View Full Profile