नवीन Galaxy Note 9 च्या US वर्जन मध्ये 6GB रॅम असेल

नवीन Galaxy Note 9 च्या US वर्जन मध्ये 6GB रॅम असेल
HIGHLIGHTS

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आणि 6GB रॅम सह लिस्ट करण्यात आला आहे.

Samsung च्या आगामी Galaxy Note 9 साठी कंपनी ने टेस्टिंग सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी स्नॅपड्रॅगन वर आधारित Note 9 गीकबेंच दिसला होता आणि आता अजून एका नवीन लीक ने ही बातमी पक्की झाली आहे. 

नवीन Galaxy Note फोन मॉडेल नंबर SM-N960U सह बेंचमार्क्ड करण्यात आला आहे. हा US मध्ये लॉन्च होणारा Note 9 असू शकतो, कारण Samsung Galaxy Note 8 चा US वेरिएंट SM-N950U मॉडेल नंबर सह दिसला होता. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आणि 6GB रॅम सह लिस्ट करण्यात आला आहे. 

SM-N960U गीकबेंच वर दुसर्‍यांदा दिसला आहे, याआधी मार्च मध्ये पण हा डिवाइस गीकबेंच वर दिसला होता. तेव्हा या स्मार्टफोन च्या CPU, रॅम आणि एंड्राइड 8.1 ओरियो ची माहिती मिळाली होती. एक लिस्टिंग चुकीची असू शकते पण जेव्हा दोनदा लिस्टिंग मध्ये तेच स्पेक्स दिसतात तेव्हा ते चुकीचे असू शकत नाहीत. 
नवीन बेंचमार्क टेस्ट चे सिंगल कोर आणि मल्टी-कोर स्कोर्स स्नॅपड्रॅगन 845 वर आधारित Galaxy S9 सारखे आहेत. 

रिपोर्ट नुसार, एक्सिनोस वर आधारित Galaxy Note 9 गीकबेंच वर दिसला होता. Samsung चा हा नवीन डिवाइस एक्सिनोस प्रोसेसर सह येईल, पण डिवाइस US मार्केट मध्ये उपलब्ध होईल. विशेष म्हणजे एक्सिनोस वेरिएंट 6GB रॅम ऐवजी 8GB रॅम सह येत आहे. 

नोट: फीचर्ड इमेज Galaxy Note 8 ची आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo