फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज: असुसच्या या फोन्स वर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट

HIGHLIGHTS

आज फ्लिपकार्ट वर बिग शॉपिंग डेजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी असुसच्या Zenfone 5Z, Zenfone Max Pro M1, Zenfone Lite L1 आणि Zenfone Max M1 डिवाइसेज वर भरभक्कम सूट मिळत आहे.

फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज: असुसच्या या फोन्स वर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट

फ्लिपकार्टच्या बिग शॉपिंग डेज अंतर्गत फ्लिपकार्ट आणि असुस ने भागेदारी केली आहे ज्यामुळे सेल मध्ये Asus Zenfone 5Z, Zenfone Max Pro M1, Zenfone Lite L1 आणि Zenfone Max M1 वर भरपूर डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्टचा हा सेल तीन दिवस चालेल जो आज म्हणजे 6 डिसेंबरला सुरु झाला आहे आणि 8 डिसेंबर पर्यंत चालेल. सेल मध्ये युजर्सना HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे.
 
फ्लॅगशिप Asus Zenfone 5Z तीन वेरीएंट्स मध्ये येतो. याच्या तीन वेरीएंट्स मध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज, 6GB आणि 128GB स्टोरेज तसेच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. हे तिन्ही वेरीएंट्स सेल मध्ये क्रमश: Rs 24,999, Rs 27,999, आणि Rs 31,999 मध्ये विकत घेता येईल. डिवाइस सेल मध्ये तीन आणि सहा महिन्यांच्या नो कॉस्ट EMI वर पण विकत घेता येतील आणि Rs 399 मध्ये मोबाईल प्रोटेक्शन प्लानचा पण फायदा घेता येईल. 
 
असुसचा Zenfone Max Pro M1 स्मार्टफोन सेल मध्ये Rs 10,999 च्या ऐवजी Rs 9,999 मध्ये उपलब्ध होईल. डिवाइसचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरीएंटची किंमत Rs 9,999 असेल, तर 4GB आणि 6GB रॅम वेरीएंट्स क्रमश: Rs 10,999 आणि Rs 13,999 मध्ये विकत घेता येईल. 
 
त्याचबरोबर, Zenfone Max M1 आणि Zenfone Lite L1 पण फ्लिपकार्ट वर सेल साठी येतील. Max M1 आणि Lite L1 सेल मध्ये डिस्काउंट नंतर क्रमश: Rs 7,499 आणि Rs 4,999 मध्ये विकत घेता येतील. या फोन्स वर पण असुस आणि फ्लिपकार्ट नो कॉस्ट EMI आणि मोबाईल प्रोटेक्शन सारख्या ऑफर्स देत आहे.
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo