कूलपॅड नोट 3 लाइट गोल्ड एडिशन अॅमेझॉनवर उपलब्ध

HIGHLIGHTS

कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोन काळा, शॅम्पेन व्हाइट आणि ग्लेशियर व्हाइट रंगात उपलब्ध आहे.

कूलपॅड नोट 3 लाइट गोल्ड एडिशन अॅमेझॉनवर उपलब्ध

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा कूलपॅड नोट 3 लाइट ७,४९९ रुपयात

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

कूलपॅडने काही दिवसांपूर्वी बाजारात आपला नोट 3 लाइट स्मार्टफोनचा गोल्ड एडिशन लाँच केला होता. आता हा फोन सेलसाठी उपलब्ध झाला आहे. ह्या फोनला ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून आपण खरेदी करु शकतो,ज्याची किंमत ७,४९९ रुपये आहे. कूूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोन काळा, शॅम्पेन, व्हाइट आणि ग्लेशियर व्हाइट रंगात उपलब्ध आहे, ज्याची ओरिजनल व्हर्जनची किंमत ६,९९९ रुपये आहे.

कूलपॅड नोट 3 लाइट गोल्ड एडिशच्या सर्व फिचर्स ह्याच्या ओरिजिनल व्हर्जनप्रमाणेच आहे. ह्यात 5 इंचाची IPS डिस्प्ले देण्यात आली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने आपण 64GB पर्यंत वाढवू शकतो.

 

हेदेखील वाचा – 3GB रॅमसह येणारे १० बजेट स्मार्टफोन्स

 

कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम ड्यूल 4G स्मार्टफोन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE, ब्लूटुथ 4.0, वायफाय आणि मायक्रो-USB फीचर्स दिले आहेत. ह्या स्मार्टफोनमध्ये 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीनुसार हा १० तासांचा टॉकटाइम आणि 200 तासांचा स्टँडबाय टाइम देईल. ह्यात एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि डिजिटल कंपास दिले गेले आहे.

 

हेदेखील वाचा – लेनोवोच्या प्रोजेक्ट टँगोवर आधारित असलेला PHAB 2 प्रो स्मार्टफोन लाँच

हेदेखील वाचा – Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo