कूलपॅड नोट 3 स्मार्टफोनची किंमत झाली कमी

कूलपॅड नोट 3 स्मार्टफोनची किंमत झाली कमी
HIGHLIGHTS

पहिल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ८,९९९ रुपये होती. मात्र कंपनीने आता ह्या फोनची किंमत ५०० रुपयांनी कमी केली आहे.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी कूलपॅडने आपला स्मार्टफोन नोट 3 च्या किंमतीत घट केली आहे. ह्या फोनची किंमत, ८,४९९ रुपये आहे, तथापि आधी ह्या स्मार्टफोनची किंमत ८,९९९ रुपये होती. मात्र कंपनीने आता ह्या फोनची किंमत ५०० रुपयांनी कमी केली आहे. हा फोन एक्सक्लूसिवरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट अमेझॉन इंडियावर खरेदी करु शकता.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक कंपनी MT6735 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम ड्यूल 4G स्मार्टफोन आहे.
अॅमेझॉनवर खरेदी करा कूलपॅड नोट 3  ८,४९९ रुपयात

कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, ब्लूटुथ 4.0, वायफाय आणि मायक्रो-USB फीचर्स आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीनुसार, हा १० तासांपर्यंतचा टॉकटाईम आणि २०० तासांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देतो. ह्यात एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि डिजिटल कंपास दिले गेले आहे.

हेदेखील वाचा – ५५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत लाँच झाला हा 4G स्मार्टफोन
हेदेखील वाचा – HP क्रोमबुक 13 G1 लॅपटॉप लाँच, 16GB रॅमने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo