कूलपॅडने भारतात आपला नवीन स्मार्टफोन कूलपॅड मॅक्स लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ रुपये ठेवली आहे. त्याचबरोबर आपण ह्याला 30 मे पासून दुपारी १२ वाजल्यापासून अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून घेऊ शकता. हा स्मार्टफोन आपल्याला गोल्ड आणि रॉयल गोल्ड रंगात मिळेल.
कूलपॅडने भारतात आपला नवीन स्मार्टफोन कूलपॅड मॅक्स लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ रुपये ठेवली आहे. त्याचबरोबर आपण ह्याला 30 मे पासून दुपारी १२ वाजल्यापासून अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून घेऊ शकता. हा स्मार्टफोन आपल्याला गोल्ड आणि रॉयल गोल्ड रंगात मिळेल. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यात ड्यूल सिम सपोर्टसुद्धा मिळत आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD 1080×1920 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, जी 401ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे, त्याशिवाय ह्यात आपल्याला गोरिल्ला ग्लास 4 चे प्रोटेक्शन मिळत आहे. ह्यात आपल्याला 64 बिट 1.5GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर मिळत आहे. चीनमध्ये हा स्नॅपड्रॅगन 615 सह लाँच केला गेला होता.
भारताबाहेर हा स्मार्टफोन अनेक स्टोरेज आणि रॅम प्रकारात उपलब्ध आहे. मात्र भारतात ह्याला 4GB आणि 64GB स्टोरेजसह लाँच केले गेले आहे, त्याचबरोबर आपण ह्याची स्टोरेज वाढवू सुद्धा शकतो.
ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर , ह्यात आपल्याला 13MP चा रियर कॅमेरा Isocell सेंसर, f/2.0 अॅपर्चर, फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि ड्यूल टोन LED फ्लॅशसह दिला गेला आहे, त्याशिवाय ह्यात आपल्याला 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यात आपल्याला 2800mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. जी कंपनीनुसार, 310 तासांचा स्टँडबाय टाइम आणि 17 तासांचा टॉक टाइम देण्यास सक्षम आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला 4G LTE, वायफाय आणि ब्लूटुथ सारखे बेसिक फीचर सुद्धा मिळत आहे.