कॉम्पॅक्ट Apple iPhone SE 2 चा भारतात होऊ शकतो एक्सक्लूसिव लॉन्च

कॉम्पॅक्ट Apple iPhone SE 2 चा भारतात होऊ शकतो एक्सक्लूसिव लॉन्च
HIGHLIGHTS

भारतात मागील iPhone SE चे यश पाहता Apple या डिवाइस ला भारतात एक्सक्लूसिवली लॉन्च करू शकतो.

बाजारात कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोंस मिळणे खुप दुर्मिळ आहे. जर मागचे काही वर्ष पाहिले तर सोनी चे कॉम्पॅक्ट फोन किंवा iPhone SE हेच असे कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप डिवाइस आहेत जे बघायला मिळतात. काही रिपोर्ट्स नुसार iPhone SE 2 लवकरच लॉन्च होईल, तर काहींच्या मते हा फोन लॉन्च होणारच नाही. 

नवीन रुमर्स नुसार जर iPhone SE 2 लॉन्च झालाच तर हा डिवाइस विशेष करून भारतात मॅन्युफॅक्चर केला जाईल. Tekz24 वर दाखवण्यात आलेल्या मागच्या रिपोर्ट वरून समोर आले आहे की या डिवाइस मध्ये ग्लास बॅक कवर असेल. ज्यामुळे डिवाइस वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करू शकेल. Tekz24 च्या नव्या रिपोर्ट वरून असे समजत आहे की हा फोन भारतातच मॅन्युफॅक्चर केला जाईल. अशा प्रकारे स्थानीय फोंस सोबत Apple स्पर्धा करू शकतो. 
 
भारतात मागील iPhone SE चे यश पाहता Apple या डिवाइस ला भारतात एक्सक्लूसिवली लॉन्च करू शकतो. जर Apple या डिवाइस ला भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये विकणार नसेल तर हा डिवाइस Foxconn आणि Pegatron च्या ऐवजी भारतातच असेम्बल केला जाईल. पण अजूनही याबाबतीत कंपनीने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे या रिपोर्ट वर पूर्णपणे विश्‍वास ठेवता येणार नाही. 
Apple Iphone SE बद्दल बोलायाचे झाले तर या डिवाइस मध्ये 4-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे आणि यात 64-बिट A9 प्रोसेसर आहे. Apple Iphone SE मध्ये ड्यूल-टोन फ्लॅश सह 12 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे. या डिवाइस मध्ये 4K विडियो रिकॉर्ड केली जाऊ शकते, सोबतच या फोन मध्ये लाइव फोटो आणि अॅप्पल पे पण आहे. 

याव्यतिरिक्त, Apple Iphone से मध्ये LED-बॅकलिट मल्टी-टच कॅपॅसिटिव टचस्क्रीन आहे. याच्या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 1136 x 640 पिक्सल आहे. या डिस्प्ले च्या पिक्सल डेनसिटी बद्दल बोलायचे झाले तर याची पिक्सल डेनसिटी 326 ppi आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo