फ्लिपकार्ट 6 ते 8 डिसेंबर दरम्यान आपल्या बिग शॉपिंग डेज सेलचे आयोजन करत आहे. सेल मध्ये कंपनी अनेक स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट देत आहे. सेल मध्ये मोटोरोलाच्या वन पॉवर स्मार्टफोन वर पण खास डिस्काउंट ऑफर दिली जात आहे आणि या सेल मध्ये मोटोरोला वन पॉवर स्मार्टफोन 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 14999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मोटोरोलाचा हा लेटेस्ट स्मार्टफोन 15,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मोटोरोला वन पॉवर व्यतिरिक्त इतर अनेक स्मार्टफोन्स वर फ्लिपकार्ट भरभक्कम डिस्काउंट देत आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
मोटोरोला वन पॉवर व्यतिरिक्त फ्लिपकार्ट Poco F1, Redmi Note 6 Pro, Nokia 5.1 Plus, Google Pixel 2 XL आणि अशाच अनेक स्मार्टफोन्स वर इंस्टेंट डिस्काउंट, नो कॉस्ट EMI सारख्या ऑफर्स पण देत आहे. आता फ्लिपकार्ट ने थोड्याच ऑफर्स सादर केल्या आहेत पण आशा आहे की सेल सुरु होताच नवीन शानदार ऑफर्स समोर येतील. लक्षात असू दे की मोटोरोला वन पॉवरची जी किंमत 1000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे ती फक्त सेल दरम्यान म्हणजे 6 ते 8 डिसेंबर मधेच असेल. या काळात तुम्ही हा फोन 14,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.
मोटोरोला वन पॉवर चे स्पेसिफिकेशन
मोटोरोला वन पॉवर मध्ये 6.2 इंचाचा फुल HD+ मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे आणि डिस्प्लेच्या टॉप वर नॉच देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 सह येतो आणि हा एड्रेनो 509 GPU सह सादर करण्यात आला आहे. हा एंड्राइड ओरियो वर चालतो आणि कंपनीचे म्हणणे आहे की लवकरच डिवाइस साठी एंड्राइड 9.0 पाई अपडेट जारी केला जाईल. हा स्मार्टफोन 4GB RAM/64GB स्टोरेज ऑप्शन मध्ये येतो.
स्मार्टफोन मध्ये 16MP + 5MP चा डुअल-रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो f/2.0 अपर्चर आणि 1.12μm पिक्सल सह येतो. मोटोरोला वन पॉवरच्या फ्रंटला 8MP चा सेंसर आहे आणि हा f/2.2 अपर्चर सह येतो तसेच हा पोर्ट्रेट मोडला सपोर्ट करतो.