BSNL ने आपल्या 241 वाल्या प्रीपेड प्लान मध्ये केले आहेत हे बदल

BSNL ने आपल्या 241 वाल्या प्रीपेड प्लान मध्ये केले आहेत हे बदल
HIGHLIGHTS

BSNL ने 241 STV व्यतिरिक्त इतर प्रीपेड प्लान्स मध्ये पण बदल केले आहेत ज्यात STV 198 आणि STV 27 चा समावेश आहे. BSNL लवकरच आपली 4G सर्विस पण लॉन्च करू शकते.

BSNL ने प्रमोशन साठी आपला Rs 241 मध्ये येणारा प्रीपेड डेटा STV रिवाइज केला आहे. यावेळेस कंपनी ने काही चांगल्या बेनेफिट्स सह प्लान सादर केला आहे. पण STV 241 फक्त डेटा प्लान आहे, त्यामुळे या प्लान मध्ये यूजर्सना वॉयस कॉलिंग किंवा SMS बेनेफिट्स मिळणार नाहीत. प्लान रिवाइज केल्यानंतर आता BSNL या प्लान मध्ये 75GB 2G/3G डेटा देत आहे. या प्लान ची वैधता 28 दिवस आहे. 

STV 241
रिविजन च्या आधी भारत संचार निगम लिमिटेड STV 241 मध्ये एकूण 7GB डेटा देत होती. पण, त्यांच्या याच प्लान मध्ये आता एकूण 75GB डेटा मिळत आहे जो आधीपेक्षा खुपच जास्त आहे. डेटा बेनिफिट प्रतिदिन 2.5GB या हिशोबाने देण्यात येणार आहे. हा एक डेटा STV आहे त्यामुळे प्लान मध्ये वॉयस कॉलिंग किंवा SMS चा कोणताही लाभ मिळणार नाही. 

ही ऑफर प्रमोशनल तत्वावर सादर करण्यात आली आहे जी 10 सप्टेंबर 2018 पासून 5 डिसेंबर 2018 पर्यंत वैध असेल. सध्यातरी BSNL ने हा बदल फक्त केरळ सर्कल मध्ये केला आहे पण येत्या काही आठवड्यांत इतर सर्कल्स मध्ये पण या बदलांची घोषणा केली जाऊ शकते. 

STV 198 आणि STV 27
BSNL अजून एक Rs 198 चा डेटा STV ऑफर करते ज्यात प्रतिदिन 2GB डेटा मिळत आहे आणि याची वैधता 28 दिवसांची आहे. आधी STV 198 मध्ये प्रतिदिन 2.5GB डेटा मिळत होता ज्याची वैधता 24 दिवसांची होती पण आता या प्लान मध्ये प्रतिदिन 2GB डेटा देण्यात येत आहे. पण प्लान ची वैधता 24 दिवसांवरून वाढवून 28 दिवस करण्यात आली आहे.  

STV 241 आणि STV 198 सोबतच कंपनी ने एंट्री-लेवल STV 27 मध्ये पण बदल केले आहेत. BSNL या प्लान मध्ये आता तीन दिवसांसाठी 1.5GB 2G/3G डेटा देत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo